Vivo T3 5G चे भारतात लाँच झाले कंफर्म, पाहा टिझर व्हिडिओ

Highlights

  • Vivo T3 5G लवकरच भारतात सादर होणार आहे.
  • यात 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • हा 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह असण्याची शक्यता आहे.

विवोने आपल्या टी-सीरीज स्मार्टफोनच्या प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे जाण्याची घोषणा केली आहे. ब्रँड यानुसार नवीन मोबाईल Vivo T3 5G लाँच करेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिझरद्वारे फोनच्या लाँचची माहिती देण्यात आली आहे. तसेच पहिले याचे काही स्पेसिफिकेशन आणि अन्य लीक समोर आले होते. चला, पुढे तुम्हाला डिव्हाईसचा टिझर व्हिडिओ आणि संभावित फिचर्सची माहिती सांगतो.

Vivo T3 5G टिझर

  • विवोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टिझर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात Vivo T3 5G च्या लाँचच्या कंफर्म करण्यात आले आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की ब्रँडने पोस्टमध्ये लाइट, कॅमेरा आणि टर्बो सारखे शब्दांचा वापर केला आहे, म्हणजे की डिव्हाईसमध्ये जबरदस्त 5G स्पीड आणि कॅमेरासह आणखी स्पेसिफिकेशनची ऑफर दिली जाईल.
  • हे पण सांगण्यात आले आहे की Vivo T3 5G फोन एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विकला जाईल.

Vivo T3 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले: लीकनुसार Vivo T3 5G मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर पंच-होल डिझाईन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये युजर्सना मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा 4 नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो.
  • स्टोरेज: लीकमध्ये समोर आले आहे की हा नवीन विवो मोबाईल 8जीबी रॅम + 256जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. त्याचबरोबर यात 8 जीबी एक्सटेंडेड रॅम फिचर पण दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: विवो टी3 5 जी मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची चर्चा आहे. ज्यात ओआयएस सह 50 मेगापिक्सलचा आयएमएक्स 882 प्रायमरी आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स मिळू शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा लावला जाऊ शकतो.
  • बॅटरी: Vivo T3 मध्ये तुम्हाला 5,000 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. याला फास्ट करण्यासाठी 44 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
    आणखी फिचर्स: हा मोबाईल पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग, कनेक्टिव्हिटीसाठी 10 5G बँड सपोर्ट, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, ड्युअल सिम 5जी, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक विकल्पांसह येऊ शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo T3 5G लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here