एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड

Mahindra XUV 400 EV Launch: महिंद्रा (Mahindra) नं अखेरीस भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली पहिली Electric SUV Car सादर केली आहे. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्सच्या माध्यमातून माहिती येत होती की कंपनी आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा एक्सयूवी400 ईव्ही (XUV 400 EV) वर काम करत आहे. आता ही कार जगासमोर ठेवण्यात आली आहे. महिंद्राच्या या नवीन इलेक्ट्रिक कार (Mahindra New Electric Car) च्या लाँचमधून स्पष्ट झालं आहे की हिची टक्कर भारतातील टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) शी होईल. दोन्ही कारमध्ये मोठ्या रेंजसह शानदार फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मिळणारी रेंज आणि टॉप स्पीड.

Mahindra XUV 400 Price आणि Sale

कंपनीनं एका इव्हेंटच्या माध्यमातून Mahindra XUV 400 EV सादर केली आहे. XUV 400 EV 16 शहरांमध्ये लाँच केली जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या कारची टेस्ट ड्राईव्ह डिसेंबर 2022 पासून 16 शहरांमध्ये सुरु होईल आणि जानेवारी 2023 च्या अखेरीस या कारची डिलिव्हरी सुरु होईल. परंतु अजूनतरी या कारची किंमत मात्र समजली नाही. आशा आहे की हिची किंमत TATA Nexon EV Max च्या जवळपास असू शकते. हे देखील वाचा: ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर

Mahindra XUV 400 Look and Design

लुक पाहता ही कार दिसायला कंपनीच्या सर्वात सेफेस्ट कार पैकी एक XUV300 सारखी दिसते. परंतु या कारमध्ये महिंद्राचा नवीन लोगो देण्यात आला आहे. Mahindra XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही साइजच्या बाबतीत महिंद्रा XUV300 पेक्षा मोठी आहे त्यामुळे एक परफेक्ट SUV आहे. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर आहे. जोडीला Mahindra XUV 400 सॅटिन कॉपर फिनिशमध्ये ड्युअल टोन रूफ ऑप्शन्ससह आर्कटिक ब्लू, एवरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू सारख्या पाच कलर ऑप्शनमध्ये येतो.

Mahindra XUV 400 चे फीचर्स

Mahindra XUV 400 EV चे फीचर्स पाहता यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक स्वरूपात डिजाइन करण्यात आलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वाइपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक शानदार फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये एक IP67 कंप्लेंट 39.5 kWh बॅटरी पॅक आणि PSM मोटर आहे जी 149.5 PS ची पीक पावर आणि 310 Nm चा मॅक्सिमम टॉर्क देते. ही कार जबरदस्त रेंजसह सादर करण्यात आली आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं दावा केला आहे की ही EV सिंगल चार्जमध्ये सुमारे 400-450 किलोमीटर पर्यंत चालू शकते, हिचा टॉप स्पीड 150 kmph असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here