Oppo Reno 10 5G भारतात लाँच! किंमत आणि डिस्काउंटचाही खुलासा

Highlights

 • Oppo Reno 10 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
 • भारतात ह्याची प्री-ऑर्डर आजपासून सुरु झाली आहे.
 • कंपनी बँक डिस्काउंट देत आहे.

Oppo Reno 10 Series अलीकडेच भारतात लाँच झाली आहे. आज कंपनीनं सीरीजच्या बेस व्हेरिएंट Oppo Reno 10 5G ची भारतीय किंमत घोषित केली आहे. ह्या सीरीज अंतगर्त कंपनीनं तीन स्मार्टफोन Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ सादर केले आहेत. लाँचच्या वेळी कंपनीनं प्रो व्हेरिएंटची किंमत सांगितली होती. तर आज बेस व्हेरिएंट Reno 10 5G ची किंमत सांगितली आहे.

Oppo Reno 10 5G ची किंमत

Oppo Reno 10 5G कंपनीनं भारतात 32,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. ह्याची प्री-ऑर्डर देखील आज म्हणजे 20 जुलै दुपारी 12:30 वाजता Flipkart वर सुरु झाली आहे. तसेच SBI, ICICI आणि Axis बँकांच्या कार्डवर 3000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. स्मार्टफोन Silver Grey आणि Ice Blue आशा दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे.

OPPO Reno 10 5G स्पेसिफिकेशन्स

 • 6.7″ 120Hz AMOLED Display
 • MediaTek Dimensity 7050
 • 32MP Selfie Camera
 • 64MP+32MP+8MP Rear Camera
 • 67W 5,000mAh Battery
 • स्क्रीन : ओप्पो रेनो 10 5जी 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 3डी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे ज्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारखे फीचर्स मिळतात.
 • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
 • कॅमेरा : OPPO Reno 10 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 67W SUPERVOOC 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो जी काही मिनिटांत फोनची बॅटरी फुल चार्ज करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here