10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा नॉच डिस्प्ले असलेला फोन नोकिया 5.1 प्लस, 1 ऑक्टोबर पासून होईल सेल

नोकिया ने गेल्या महिन्यात भारतात नॉच ​डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करत एक साथ दोन फोन सादर केले होते. कंपनी ने नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस सादर केले होते. यातील नोकिया 6.1 प्लस आधीच देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे तसेच आज कंपनी ने नोकिया 5.1 प्लस पण भारतीय बाजारात किंमती सह लॉन्च ​केला आहे. नोकिया 5.1 प्लस 10,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 1 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 5.1 प्लस ची सर्वात मोठी खासियत यातील नॉच डिस्प्ले आहे. हा नोकियाचा दुसरा स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने फोन 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले आहे.

नोकिया 5.1 प्लस एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर केला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे फोनला गूगल कडून येणारे एंडरॉयड चे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. म्हणजे काही दिवसांत हा फोन एंडरॉयड पाई वर पण अपडेट होईल. हा फोन 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो.

नोकिया 5.1 प्लस देशात 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅश सोबत वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 प्लस 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 1 ऑक्टोबर पासून ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस मीडनाईट ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here