91मोबाईल्सने गेल्या आठवड्यात बातमी दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि टेक कंपनी वीवो आपल्या हिट स्मार्टफोन वी11 प्रो च्या अपग्रेडेड वर्जन वर काम करत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन पुढील महिन्यात बाजारात येईल. आज आम्हाला पुन्हा या फोन संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यावरून समजते कि वीवोच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल आणि या फोनचे नाव असेल वी15 प्रो.
वीवो वी15 प्रो बद्दल आम्हाला बातमी मिळाली आहे कि वीवो इंडिया फेब्रुवारी मध्ये आपली वी सीरीज वाढवत भारतात हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. वीवो वी15 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. वी15 प्रो मध्ये वीवो नेक्स प्रमाणे इनविजिबल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या डिस्प्ले वर नसून फोन बॉडीच्या आत असतो जो बाहेरून दिसत नाही. सेल्फी कमांड देताच हा कॅमेरा सेटअप फोन बॉडीच्या बेहरे येतो आणि फोटो क्लिक करतो.

वीवो वी15 प्रो गेल्यावर्षी देशात लॉन्च झालेल्या वी11 प्रो चा नवीन वर्जन आहे. प्राप्त माहितीनुसार वी15 प्रो सोबत कंपनी वी15 स्मार्टफोन पण भारतात आणेल. वी15 मध्ये पॉप-अप कॅमेरा दिला जाईल किंवा नाही याविषयी काहीच सांगता येणार नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वीवो वी15 प्रो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉन्च केला जाईल. वीवो आपला हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून लॉन्च करेल तसेच याची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल.
32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सोबत वी15 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल. तसेच वी15 प्रो मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. आशा आहे कि वीवोचा हा फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लेटफॉर्म वर सेलसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे वीवो इंडिया ने पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोन वीवो नेक्स चे प्रोडक्शन आधीच बंद केले आहे. त्यामुळे वीवो वी15 प्रो वीवो नेक्स ची जागा घेईल. वीवो इंडिया ने आतापर्यंत वी15 आणि वी15 प्रो संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. वी15 आणि वी15 प्रो ची लॉन्च डेट तसेच याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळताच तुमच्यापर्यंत पोचवली जाईल.
इनपुट : केशव खेडा














