लॉन्च झाला 50MP कॅमेरा आणि 1000+ चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Honor V40, दमदार आहेत या फोनचे फीचर्स

पॉप्युलर स्मार्टफोन ब्रँड Honor ने पॅरेंट कंपनी Huawei पासून बाजूला गेल्यानंतर आपला पहिला स्मार्टफोन ऑनर वी40 चिनी टेक मार्केट मध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे Huawei ने अमेरिकन निर्बंधांमुळे आपला ऑनर ब्रँड विकला होता. आशा आहे कि ऑनर वी 40 ग्लोबल वेरिएंट (ज्याला ऑनर व्यू 40 नाव देण्यात आले आहे) गुगल प्ले सर्विसेज सह येऊ शकतो. फोन लुक आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत खूप शानदार आहे. लक्षात असू द्या कि ऑफिशियल होण्याआधीच हँडसेट JD.com, Tmall, Suning सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर बुकिंगसाठी उपलब्ध झाला होता.

लुक व डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हा बेजललेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हँडसेटच्या फ्रंटला पिल शेप मॉड्यूल मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा लेफ्ट डिस्प्ले कर्व्ड डिजाइन सह येतो. तर, उजवीकडे अगदी नगण्य बेजल आहे. फोनच्या टॉप आणि बॉटमला थोडे बेजल दिसतील. तसेच मागे वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप दिसायला असा वाटतो कि जणू फोन मध्ये मल्टीपल कॅमेरा सेंसर आहेत. पण, फोटोग्राफीसाठी फक्त तीन कॅमेराच मागे कंपनीने दिले आहेत. इतर फ्लॅश लाइट आणि दुसरे सेंसर आहेत.

Honor V40

हे देखील वाचा : 6GB रॅम सह येईल Nokia चा स्वस्त 5G फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी?

डिस्प्ले

Honor V40 मध्ये कंपनीने 6.72-इंचाचा फुल एचडी+ OLED वॉटरफॉल डिस्प्ले दिला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. फोनचा डिस्प्ले 1236 x 2679 पिक्सल रेजॉल्यूशन वर बेस्ड आहे. इतकेच नव्हे तर स्क्रीन 80-डिग्री सूपर लार्ज, P3 वाइड कलर gamut, 93 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह TUV Rheinland ग्लोबल आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन 2.0 सह येतो.

प्रोसेससर

प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 1000+ चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी रेनो5 प्रो मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा

Honor V40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 50MP प्राइमरी सेंसर आहे जो कि RYYB अल्ट्रा-लाइट-सेंसिंग टेक्नोलॉजीचा वापर करतो. फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो सेंसर क्लोज-अप शॉट्ससाठी देण्यात आला आहे. या फोन मध्ये एलईडी फ्लॅश आणि लेजर ऑटोफोक्स आहे जो कॅमेरा मॉड्यूल मधेच आहे. तसेच, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 16MP डुअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Honor V40 मध्ये 4,000mAh ची बॅटरी पावर बॅकअपसाठी देण्यात आली आहे जी 66W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 802.11 a / b / g / n / ac / 6 ब्लूटूथ 5.1, NFC, आणि GPS चा समवेश आहे.

किंमत

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या Honor V40 5G वेरिएंटची किंमत RMB 3,599 (जवळपास 40,600 रुपये) आहे. तर, 8GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 3999 (जवळपास 45,200 रुपये) आहे. फोन चीन मध्ये आधीच उपलब्ध आहे आणि नाइट ब्लॅक, टाइटेनियम सिल्वर, रोज गोल्ड कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here