Jio मुळे नाखुश होऊ लागलेत ग्राहक जाणून घ्या कारणे, तुम्ही पण आहात का यातील एक?

Reliance Jio येण्याआधी आणि आल्यानंतर भारतातील टेलीकॉम बाजारात किती बदल झाला आहे, याची माहिती आपल्याला आहे. जियो बाजारात आल्यानंतर टेलीकॉम प्लान्सचे टॅरिफ खूप कमी झाले आहेत आणि देशात कनेक्टिविटी पण वेगाने पसरली आहे हे सत्य आहे. रिलायंस जियोमुळेच आज सर्व कंपन्या कमी किंमतीत 4जी इंटरनेट देत आहेत. Jio आज भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे आणि तिचा यूजर बेस सतत वाढत आहे. पण असे असूनही अनेक असे जियो यूजर समोर येत आहेत जे Reliance Jio वर नाखूष आहेत. याची वेगवेगळी कारणे आहेत, पण या सर्व लोकांना Jio आधीप्रमाणे आवडत नाही. आमच्या वाचकांच्या प्रतिक्रिया घेऊन आम्ही असे काही मुद्दे काढले आहेत जे जियो यूजर्सना आवडत नाहीत. हे यूजर आता Jio च्या मुळे नाखुश राहू लागले आहेत.

1. कमकुवत सिग्नल

Reliance Jio यूजर्सची कंपनी कडे सर्वात मोठी तक्रार हि आहे कि जियोचा नेटवर्क खूप कमी येतो. पण हि समस्या सर्व ठिकाणी आणि सर्व प्रकारच्या यूजर्सची नाही. पण अनेक असे जियो ग्राहक आहेत जे आपल्या क्षेत्रात नेटवर्क न येण्याची तक्रार करतात. अनेक यूजर्सचे म्हणणे आहे कि सुरवातीला जेव्हा जियो सिम घेतला होता, तेव्हा सर्विस जास्त चांगली होती पण नंतर सिग्नल कमजोर होऊ लागला आणि आता नेटवर्कची समस्या समोर येऊ लागली आहे.

2. स्लो इंटरनेट

Reliance Jio हिट होण्याचे सर्वात मोठे कारण कंपनी द्वारे दिला जाणारा 4G इंटरनेट. जियो देशातील एकमेव अशी टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4जी नेटवर्क वर चालते. फास्ट इंटरनेटने जियोला स्मार्टफोन यूजर्सची पहिली पसंत बनवले होते. पण आता Jio च्या या सर्वात मोठ्या खासियतची रंगत फीकी पडताना दिसत आहे. अनेक जियो ग्राहकांनी त्यांच्या फोन मध्ये 4G इंटरनेट स्लो चालत असल्याची तक्रार केली आहे. इंटरनेटचा स्पीड खूप कमी झाल्यामुळे Jio यूजर नाराज दिसत आहेत.

3. ना स्वस्त, ना मस्त

Jio ने टेलीकॉम बाजारात आपली सुरवात हुकमाचा एक्क्याने केली होती. आणि तो होता फ्री सिम देऊन फ्री इंटरनेट आणि फ्री कॉलिंग देणे. मोबाईल दुकानांसमोर रिलायंस जियोच्या फ्री सिम साठी लांबच लांब रांगा लागलेल्या तुमच्या लक्षात असेल. जवळपास 6 महिन्यांपर्यंत जियो यूजर्सनी 1 रूपया पण खर्च न करता सर्व टेलीकॉम सर्विसेजचा लाभ घेतला आहे. वेळे बरोबर आणि मार्केट मधील स्पर्धेमुळे Reliance Jio फ्री तर राहिली नाही पण आता यूजर्सची तक्रार आहे कि जियो स्वस्त पण राहिली नाही. सध्या Airtel, Vodafone Idea आणि BSNL पण स्वस्तात चांगले प्लान्स आणि फायदे देत आहेत. Jio यूजर्स म्हणतात कि कंपनी आता स्वस्त राहिलेली नाही आणि सुविधांच्या बाबतीत सुधारलेली पण नाही.

4. Jio Phone च्या अपेक्षा राहिल्या अपुऱ्या

Reliance Jio चा अजून एक मास्टर स्ट्रोक असलेला आणि कंपनीने लॉन्च केलेला 4G फीचर फोन Jio Phone. जियोफोन कंपनीने मोफत विकला होता, ज्या साठी काही रक्कम सिक्योरिटी म्हणून घेण्यात आली होती. कंडिशन्सनुसार टेलीकॉम बेनिफिट्स सोबत हि सिक्योरिटी मनी नंतर परत मिळणार होती. पण मोठ्या आवडीने विकत घेतलेल्या जियोफोनने पण लोकांची निराश केली. अनेक ठिकाणी सिक्योरिटी मनी मिळाली नाही तर काही ठिकाणी फोनच्या सर्विसची तक्रार येऊ लागली. तसेच Jio Phone च्या यशानंतर जियो ग्राहकांना अपेक्षा होती कि आता रिलायंस जियो मोबाईल बाजारात अजून नवीन मॉडेल्स घेऊन येईल, पण कंपनीने Jio Phone 2 लॉन्च केल्यानंतर मोठा ब्रेक घेतला आहे त्यामुळे प्रतीक्षा करणारे यूजर्स नाखुश आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here