Vivo V25 Pro बद्दल गेले कित्येक दिवस चर्चा सुरु आहे. अलीकडेच एक फोटो लीक झाला होता ज्यात विराट कोहलीच्या हातात हा फोन दिसला होता. तर आज 91मोबाईल्सला या स्मार्टफोनबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून आम्हाला समजलं आहे की Vivo V25 Pro स्मरफोन 17 ऑगस्टला भारतात लाँच केला जाईल आणि 25 ऑगस्टपासूनसे या फोनची विक्री सुरु होईल. आम्हाला ही माहिती विवोच्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळाली आहे ज्यांनी आधी देखील कंपनी संबंधित बरीच खास माहिती दिली आहे जी खरी ठरली आहे. फोनबाबत आतापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार यात 64MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल आणि कंपनी यावेळी देखील Vivo 23 pro प्रमाणे कलर चेंजिंग बॅक पॅनल सादर करेल.
Vivo V25 Pro चे लीक स्पेसिफिकेशन
- लाँच 17 ऑगस्ट
- सेल 25 ऑगस्ट
- Full HD + 3D कर्व्ड AMOLED
- MediaTek डायमेंसिटी 1300 प्रोसेसर
- 8GB रॅमसह 128 GB
- 64 MP ट्रिपल OIS कॅमेरा
- 66W फास्ट चार्जिंग
लीकमध्ये दावा केला जात आहे की Vivo V25 Pro च्या बॅक पॅनलवर फ्लोराइट एजी ग्लाससह रंग बदलणारी टेक्नॉलॉजी मिळेल. तसेच, यात Full HD + रेजोल्यूशन सह 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळेल. कंपनी 120Hz रिफ्रेश रेटसह हा फोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन MediaTek डिमेन्सिटी 1300 चिपसेटसह बाजारात येईल जो OnePlus Nord 2T 5G मध्ये दिसला होता. हे देखील वाचा: फक्त 8,000 रुपयांमध्ये येतोय Vivo Y02s, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
मेमरीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 128GB मेमरी मिळेल. तसेच याचा अजून एक व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह येऊ शकतो. रिपोर्टनुसार दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला रॅम 8GB च मिळेल. पावर बॅकअप बद्दल बोलायचे तर हा फोन आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा अपग्रेडेड असेल. फोनमध्ये तुम्हाला 66W ची फास्ट चार्जिंग मिळू शकते, उलटपक्षी Vivo V23 pro मध्ये 44W चार्जिंग स्पीड मिळाला होता.
अलीकडेच आलेल्या एका लीकनुसार Vivo V25 Pro मध्ये 64 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच फोनच्या मेन कॅमेऱ्यासह OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन दिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर यात EIS म्हणजे इलेक्ट्राॅनिक इमेज स्टॅबिलायजेशन सारखे फीचर्स देखील मिळतील. फ्रंट कॅमेरा पाहता, हा फोन 32 एमपी च्या सिंगल सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. तसेच फोनमध्ये तुम्हाला सुपर नाइट मोड सारखे फीचर्स मिळतील. प्राईस बद्दल अजूनतरी मोठी माहिती लीक झाली नाही परंतु हा फोन 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे. या बजेटमध्ये रियलमी, वनप्लस आणि शाओमीचे डिवाइस या फोनशी स्पर्धा करतील. हे देखील वाचा: 32 हजारांचा फोन फक्त 8,249 रुपयांमध्ये! Xiaomi च्या सर्वात हलक्या 5G फोनवर जबरदास ऑफर















