50MP चा शानदार Selfie Camera! 20GB RAM सह Vivo V27Pro 5G भारतात दाखल

Highlights

  • Vivo V27 Pro स्मार्टफोनमध्ये 7 5G Band देण्यात आला आहे.
  • Memory Fusion टेक्नॉलॉजीमुळे 20GB RAM ची पावर मिळते.
  • विवो वी27 प्रो मध्ये 50MP Rear आणि 50MP Selfie Camera आहे.

गेली कित्येक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर विवोची ‘व्ही’ सीरीज अखेरीस भारतात दाखल झाली आहे. या सीरिजमध्ये 50MP Rear आणि 50MP Selfie Camera असलेला जबरदस्त Vivo V27 Pro 5G लाँच करण्यात आला आहे. जरी हा कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असला तरी कंपनीनं यात 12GB RAM आणि Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे तुम्ही विवो वी27 प्रोच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती वाचू शकता.

Vivo V27 Pro 5G Price

विवो वी27 प्रो 5जी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये बाजारात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंट 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. हा विवो फोन आजपासून प्रीबुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे ज्याचा सेल 6 मार्चपासून सुरु होईल. हा मोबाइल फोन फ्लिपकार्ट व स्टोर्सवरून Noble Black आणि Magic Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo V27 Pro 5G Specifications

  • 6.78″ FHD+ AMOLED Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200
  • 50MP Rear Camera
  • 50MP Selfie Camera
  • 66W 4,600mAh battery

विवो वी27 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. विवोनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. या फोनची जाडी फक्त 7.36एमएम आहे. हे देखील वाचा: 5 मिनिटांत बॅटरी झाली फुल! 300W Fast Charging टेक्नॉलॉजीसह Redmi नं रचला इतिहास

Vivo V27 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे आणि ओरिजनओएस 3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 64बिट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा विवो फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो जो एक्स्ट्रा 8जीबी रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे वी27 प्रो स्मार्टफोन 20जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo V27 Pro एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक

पावर बॅकअपसाठी या विवो फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. Vivo V27 Pro 5G आणि 4G दोन्हीवर चालतो तसेच यात 7 5जी बँड्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 164.1×74.8×7.36एमएम आणि वजन 182ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here