देशात अनेक प्रकारच्या टू व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर आणि फोर व्हीलर कार आल्यानंतर एक नवीन इलेक्ट्रिक वाहन येत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार्गो मालाची वाहुतक करण्यासाठी बनवण्यात आली आहे. Dandera Ventures नं भारतात नवीन Electric Cargo लाँच केली आहे. कंपनीनं हिचे नाव OTUA Electric Cargo असं ठेवलं आहे. विजेवर चालणारे हे तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन युजर्सना 300 किलोमीटर पर्यंतची मोठी रेंज देतं. म्हणजे ही Electric Three Wheeler डिलिव्हरी करणाऱ्या त्या सर्व लोकांना खूप आवडू शकते, जे पेट्रोल आणि डिझलच्या किंमतीमुळे त्रस्त आहेत. कंपनीनं देखील डिलिव्हरी आणि लॉजिस्टिकमध्ये काम करणाऱ्या युजर्सना लक्षात ठेवून OTUA इलेक्ट्रिक कार्गोची निर्मिती केली आहे.
OTUA Electric Cargo चे फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत देखील ही इलेक्ट्रिक थ्री व्हीलर खूप उपयुक्त ठरेल. ही 900 किलोग्राम पर्यंत वजन वाहू शकते. कंपनीचा दावा आहे की ही इंडस्ट्रीमध्ये आता पर्यंतची सर्वात जास्त माल वाहतूक करणारी इलेक्ट्रिक कार्गो आहे. यात 12.8 किलो वॅट लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक थ्री व्हीलर एअर कंडीशनसह येते. ज्यात ड्राईव्हरच्या केबिनमध्ये शानदार कूलिंग मिळेल. हे देखील वाचा: Honda electric scooter संबंधित गुड न्यूज; लवकरच होणार भारतात लाँच
वेग आणि रेंज
OTUA Electric Cargo Three-Wheeler चा वेग पाहता, ही ताशी 55 किलोमीटरचा टॉप स्पीड देऊ शकते. हिच्या बेस व्हेरिएंटमध्ये सिंगल चार्ज वर 165 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळते, जी 300 किलोमीटर पर्यंत वाढवता येते. ब्रेकिंगसाठी यात डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार्गोमध्ये स्वॅपेबल बॅटरी फीचर देण्यात आला आहेत, म्हणजे दूरवरच्या प्रवासात चार्जिंग स्टेशन न मिळाल्यास बॅटरी बदलून देखील पुढे जाता येईल. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ
OTUA Electric Cargo Price
कंपनीनं ही शानदार कार्गो इलेक्ट्रिक थ्री व्हीलर 3.5 लाखांमध्ये लाँच केली आहे. हिची किंमत 3.5 लाख रुपयांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरिएंट 5.5 लाख रुपयांपर्यंत येतो. सध्या कंपनीनं हिची प्री बुकिंग सुरु केली आहे. या थ्री व्हीलरची पहिली सेल साल 2023 च्या पहिल्या तिमाहीत सुरु होईल. सर्वप्रथम ही थ्री व्हीलर, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उपलब्ध होईल, त्यानंतर हळूहळू ही भारतात अन्य ठिकाणी देखील विकली जाईल.