Vivo V30 आणि V30 Pro चे रिटेल पोस्टर भारतातील लाँचच्या आधी लीक, लवकर होऊ शकते एंट्री

Highlights

  • Vivo V30 सीरिज लवकर भारतात सादर होऊ शकते.
  • यात Vivo V30 आणि V30 Pro सादर केले जाऊ शकतात.
  • Vivo V30 Pro मध्ये ZEISS लेन्सला सपोर्ट मिळू शकतो.

विवो भारतात आपल्या V30 सीरिजला आणण्याच्या तयारीमध्ये आहे. यात Vivo V30 आणि Vivo V30 Pro असे दोन फोन लाँच होणार असल्याची शक्यता आहे. परंतु अजून भारतीय लाँचबद्दल ब्रँडने घोषणा केलेली नाही याआधी देखील माय स्मार्ट प्राइसने मोबाइलचे भारतातील रिटेल पोस्टर आणि काही प्रमुख कॅमेरा स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत. चला, पुढे पूर्ण लीकची माहिती जाणून घेऊया.

Vivo V30 आणि V30 Pro चे रिटेल पोस्टर (लीक)

  • लीकनुसार विवो V30 प्रो मोबाइलमध्ये सहा वेगवेगळे ZEISS स्टाइल पोर्ट्रेट मोड मिळण्याची चर्चा आहे. ज्यांच्या मदतीने दिवसा आणि रात्री तुम्हाला कॅमेऱ्याचा चांगला अनुभव मिळू शकतो.
  • सांगण्यात आले आहे की या मोडमध्ये ZEISS सिने-फ्लेयर पोर्ट्रेट, सिनेमॅटिक, बायोटार, प्लॅनर, डिस्टॅगन आणि सोनारचा समावेश केला जाऊ शकतो.
  • पोर्ट्रेट मोड फक्त फोटो नाही व्हिडिओ मध्ये पण मिळू शकतो. Vivo V30 Pro डिव्हाइसवर ZEISS सिनेमॅटिक व्हिडिओ बोकेह आणि ZEISS नॅचरल कलर मोड दिले जाऊ शकतात.
  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये हे पण पाहू शकता की Vivo V30 सीरीजला कमिंग सून सोबत दाखविले गेले आहे. म्हणजे की लवकरच भारतात फोन लाँच होऊ शकतो.

Vivo V30 Pro चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: विवो V30 प्रो फोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2,800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 2800×1260 पिक्सल रिजॉल्यूशन मिळू शकतो.
  • प्रोसेसर: Vivo V30 Pro मोबाइलमध्ये संभाव्य मीडियाटेक डाइमेंसिटी 8200 चिपसेट लावला जाऊ शकतो.
    मेमरी: हा मोबाइल फोन 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: Vivo V30 Pro मध्ये ZEISS लेन्सला सपोर्ट असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी, 50MP चा अल्ट्रावाइड आणि 50MP चा पोर्ट्रेट टेलीफोटो लेन्स दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत Vivo V30 Pro मध्ये 80W चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • ओएस: स्मार्टफोनला अँड्रॉइड 14 आधारित फनटचओएस 14 सोबत आणले जाऊ शकते.
  • अन्य: डिव्हाइसमध्ये ड्युअल सिम 5जी, वायफाय, ब्लूटूथ, धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP54 रेटिंगसोबत अनेक फिचर्स मिळू शकतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here