Vivo V40 SE 5G फोन झाला जागतिक बाजारात लाँच, Ultra Vision AMOLED Screen सह मिळेल 16GB RAM ची ताकद

विवोने जागतिक बाजारात आपल्या ‘वी40’ सीरिज सादर करत नवीन स्मार्टफोन Vivo V40 SE 5G लाँच केला आहे. हा मोबाईल पश्चिमी देशांमध्ये आणला गेला आहे जो Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर वर चालतो. फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे फिचर्स पण मिळतात. सध्याच्या किंमतीची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु याचा लूक, डिझाईन, फिचर्स व स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V40 SE 5G चे स्पेसिफिकेशन

परफॉर्मन्स: विवो वी40 एसई 5जी फोन Android 14 वर लाँच झाला आहे जो Funtouch OS 14 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 4nm फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2GHz CPU Clock Speed ला सपोर्ट करतो.

मेमरी: हा विवो स्मार्टफोन 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात 8GB Extended RAM टेक्नॉलॉजी पण आहे जो फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 16GB RAM ची ताकद प्रदान करतो. तसेच फोनमध्ये इंटरनल 256GB Storage देण्यात आली आहे ज्यासोबत 1TB Card ला सपोर्ट पण मिळतो.

डिस्प्ले: Vivo V40 SE 5G फोन 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67-इंचाच्या पंच-होल स्क्रीनला सपोर्ट करतो. ही E4 AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz Refresh Rate वर चालते. कंपनीने याला अल्ट्रा व्हिजन अ‍ॅमोलेड डिस्प्ले सांगितले आहे. यावर 1800nits Brightness आणि 107% Color Saturation सारखे फिचर्स मिळतात.

बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा विवो फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात f/1.8 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 8MP Ultra Wide-Angle Lens तसेच 2MP Macro Sensor सह मिळून चालतो.

फ्रंट कॅमेरा: इन्स्टाग्राम रिल्स बनविण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी Vivo V40 SE 5G 16MP Selfie Camera ला सपोर्ट करतो जो f/2.0 अपर्चरवर चालतो. यात Night, Portrait, Photo, Video, Dual View, Live Photo सारखे फिचर्स पण मिळतात.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh Battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईल 44W Fast Charging ला सपोर्ट करतो. कंपनीनुसार हा फोन 24 मिनिटामध्ये 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो तसेच 16.6 तासाची YouTube Streaming देऊ शकतो.

Vivo V40 SE 5G चे फिचर्स

  • 3D FLAT DESIGN
  • Anti-Stain Coating
  • Dual Stereo Speaker
  • In-Display Fingerprint
  • Eye Care Display
  • RAM Saver
  • IP5X + IPX4
  • 7.99mm thickness
  • 4-Year Battery Health
  • Smart Charging Engine 2.0
  • Crystal Black, Leather Purple Color

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here