ऑनलाइन शॉपिंगमधील ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय? जाणून घ्या

सणासुदीचे दिवस आले आहेत त्यामुळे ई-कॉमर्स विश्वातील दिग्गज कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काउंट ऑफरची घोषणा करत आहेत. खास ऑनलाइन सेल आयोजित करत आहेत. परंतु ऑनलाइन सेल दरम्यान फसवणूक झाल्याचा अनेक बातम्या येतात, ज्यात मागवलेल्या वास्तूच्या ऐवजी भलतीच गोष्ट डिलिव्हर होते. अशा वेळी ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांमध्ये वाद सुरु होतो. बऱ्याचदा ग्राहकांना न्याय मिळत नाही, परंतु यावर एक उपाय आता आला आहे.

तुम्हाला माहित आहे का अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट दोन्ही कंपन्या ओपन बॉक्स डिलिव्हरी चा ऑप्शन देत आहेत, जो सिलेक्ट केल्यावर प्रीपेड ऑर्डरच्या वेळी तुमची फसवणूक होणार नाही. चला या आर्टिकलमध्ये जाणून घेऊया की ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय आणि यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: 10 हजारांच्या रेंजमध्ये 64MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच

Open Box Delivery म्हणजे काय?

जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनवरून ओपन बॉक्स डिलिव्हरी सर्व्हिसचा ऑप्शन निवडला तर डिलिव्हरी बॉय कस्टमरला त्याच्या समोर पॅकेज ओपन करून दाखवतो. म्हणजे तुमच्या समोरच बॉक्स ओपन झाल्यामुळे तुम्ही मागवलेली वस्तू त्यात आहे की नाही हे तुमच्या समोरच स्पष्ट होते. परंतु सध्या ही सर्व्हिस सर्व पिनकोडसाठी उपलब्ध नाही. काही निवडक पिनकोडवरच ही सुविधा उपलब्ध आहे. याची माहिती ऑर्डर करते वेळी ओपन बॉक्स डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करताना तुम्हाला मिळेल.

ऑर्डरची वेळ करा सिलेक्ट

जर तुमच्या पिनकोडवर ओपन बॉक्स डिलिव्हरीची सर्व्हिस उपलब्ध असेल तर ऑर्डरच्या वेळी तुम्हाला ऑप्शन दिसेल. तुम्ही इथे हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर Delivery Boy तुमच्या समोर Box Open करेल.

ओपन बॉक्स डिलिव्हरीचा उपयोग

जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on Delivery) चा ऑप्शन निवडला तर तुम्हाला आधी पेमेंट करावं लागेल. त्यानंतर पेमेंट डिलिव्हरी बॉय बॉक्स उघडून दाखवेल. जर तुमची ऑर्डर डॅमेज असेल किंवा चुकीची असेल तर त्याक्षणीच रिटर्न आणि रिफंडची सुविधा मिळेल. जर तुम्ही आधी ऑनलाइन पेमेंट केलं असेल तर सेलर्सच्या रिटर्न पॉलिसीनुसार रिफंड मिळेल.

ओपन बॉक्स डिलिव्हरी चार्ज?

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर ओपन बॉक्स डिलिव्हरीची सर्व्हिस पूर्णपणे फ्री आहे. यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे जर तुम्ही कधीही महाग सामान ऑर्डर केलं तर हा ऑप्शन नक्की सिलेक्ट करा. हे देखील वाचा: Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम

या प्रोडक्ट्सवर मिळेल ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन

ओपन बॉक्सचा ऑप्शन खासकरून स्मार्टफोन आणि मोठे इलेक्ट्रॉनिक्स जसे की टेलिव्हिजन आणि वॉशिंग मशीन इत्यादी प्रोडक्ट्सच्या खरेदीच्या वेळी सिलेक्ट करता येईल.

नोट: ओपन बॉक्स डिलिव्हरी संबंधित अधिक माहिती तुम्ही फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा अ‍ॅपवर वाचू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here