Vivo V40 SE 5G फोन झाला जागतिक बाजारात लाँच, मिळेल 16MP Selfie Camera आणि 16GB RAM ची पावर

विवोने गेल्या महिन्यात टेक मार्केटमध्ये आपल्या ‘वी 40’ सीरिजची सुरुवात करत Vivo V40 SE 5G फोन सादर केला होता. कंपनीकडून या मोबाईलचा लूक व डिझाईनसह अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन टिझ करण्यात आले आहेत, तसेच आता विवोने आपला हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. Qualcomm Snapdragon 4 Gen 2 च्या ताकदीसह आणल्या गेलेल्या विवो वी 40 एसई 5 जी फोनची किंमत व स्पेसिफिकेशन तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V40 SE 5G ची किंमत (जागतिक)

विवो वी40 एसई 5जी फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाईल फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आणला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनची किंमत €299 जी भारतीय चलनानुसार 25,900 रुपयांच्या आसपास आहे. युरोपियन देशांमध्ये हा विवो स्मार्टफोन Crystal Black आणि Leather Purple कलरमध्ये विकला जाईल.

Vivo V40 SE 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.67″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 8 जीबी एक्सटेंडेड रॅम
  • 50 एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा
  • 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 44 वॉट फास्ट चार्जिंग
  • 5,000 एमएएचची बॅटरी

डिस्प्ले : Vivo V40 SE 5G फोन 2400 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही अल्ट्रा व्हिजन अ‍ॅमोलेड पॅनल स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. तसेच फोनमध्ये 1800 निट्स पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट पण देण्यात आला आहे.

परफॉर्मन्स : विवो वी 40 एसई 5 जी फोन अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : जागतिक मार्केटमध्ये हा विवो स्मार्टफोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 8 जीबी एक्सटेंडेड रॅम पण देण्यात आली आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची ताकद प्रदान करतो. मोबाईलमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते, ज्यामुळे याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा विवो फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह मिळून चालतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच इन्स्टाग्राम रिल्स बनविण्यासाठी Vivo V40 SE 5G फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा एफ/2.0 अपर्चरवर काम करणारा सेन्सर आहे ज्यात नाईट, पोर्टरेट व लाईव्ह फोटो मोड सोबतच ड्युअल व्यू सारखे फिचर्स पण मिळतात.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी 40 एसई 5 जी फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह बनविण्यात आले आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा मोबाईल 24 मिनिटामध्ये 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो तसेच 16.6 तासाची YouTube Streaming देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here