Airtel चं इंटरनेट स्लो झालं आहे का? रॉकेट स्पीडनं 4G इंटरनेट वापरण्यासाठी वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

Airtel APN settings: भारतीय स्मार्टफोन्स युजर्स सध्या 5G Launch ची वाट बघत आहेत, नवीन पिढीच्या नेटवर्कवर अविश्वसनीय इंटरनेट स्पीड मिळेल अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी भारती इंटरप्राइजेसचे चेयरमन सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांनी Bharti Airtel ची 5G सर्व्हिस (Airtel 5G Launch) भारतात ऑक्टोबरमध्ये लाइव्ह केली जाईल अशी माहिती दिली होती. परंतु संपूर्ण भारतात 5G पोहोचण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. परंतु स्लो इंटरनेटमुळे त्रस्त असलेले Airtel 4G युजर त्यांच्या फोनमधील Airtel APN सेटिंग बदलून शानदार इंटरनेट स्पीड मिळवू शकतात. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला एयरटेल एपीएन सेटिंग्स बदलण्याची माहिती दिली आहे.

APN म्हणजे काय?

APN चा फुलफॉर्म अ‍ॅक्सेस पॉईंट नेम (Access Point Name) असा आहे, जी सर्व सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी संबंधित मुख्य सेटिंग आहे. तुमच्या कॅरियरच्या मोबाईल नेटवर्कला इंटरनेटशी लिंक करण्याचा काम एपीएन करतं. प्रत्येक मोबाईल नेटवर्क कंपनीची एपीएन सेटिंग वेगळी आहे. योग्य एपीएन सेटिंग्स एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेम आणि अन्य अनेक कामांसाठी तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकते.

अँड्रॉइडवर एयरटेल एपीएन सेटिंग्स अशी बदला

एयरटेल एपीएन सेटिंग्स एसएमएस, ऑनलाइन आणि मोबाइल सेटिंग्सचा वापर करू बदलता येते. जर तुम्ही वेगवान 4जीचा आनंद घेण्यासाठी Android Mobile Phone वर एयरटेल एपीएन सेटिंग्स बदलण्याची पद्धत शोधत असलात तर पुढील स्टेप्स फॉलो करा.

एसएमएसच्या माध्यमातून एपीएन सेटिंग्स बदलण्यासाठी

  • सर्वप्रथम ‘MO’ टाइप करा आणि हा मेसेज 54321 वर पाठवा.
  • त्यानंतर एयरटेल एपीएन सेटिंग्ससह एक एसएमएस मिळेल. एसएमएस ओपन करा आणि ‘ओके’ वर क्लिक करा.
  • Android मोबाइल फोनवर वेगवान 4G इंटरनेटसाठी तुमचा मोबाइल रिस्टार्ट करा.

वेबसाइटच्या माध्यमातून APN सेटिंग्स बदलण्यासाठी

  • एयरटेल मोबाइल इंटरनेट सेटिंग वेबपेजवर जा किंवा इथे क्लिक करा.
  • मोबाइल नंबर नोंदवा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • तुम्हाला एयरटेल एपीएन सेटिंग्सचा एसएमएस मिळेल.
  • मेसेज ओपन करा आणि सेटिंग्स डिफॉल्ट म्हणून सेव्ह करा.

सेटिंग्समधून APN सेटिंग्स बदलण्यासाठी

  • तुमच्या Android मोबाइल फोनच्या सेटिंग्स मध्ये जा.
  • मोबाइल नेटवर्कवर क्लिक करा.
  • एयरटेल सिमवर क्लिक करा.
  • अ‍ॅक्सेस पॉईंट नेम्स (APN) वर क्लिक करा.
  • New APN वर क्लिक करा आणि सर्व डिटेल्सची माहिती भरा आणि Save/Done वर क्लिक करा.
  • हे केल्यावर तुम्हाला फास्ट 4 जी इंटरनेट वापरता येईल.

आयफोनवर एयरटेल एपीएन सेटिंग्स अशी बदला

iPhone वर Airtel APN सेटिंग बदलण्याची पद्धत शोधत आहात> वास्तवात तुम्हाला कोणताही बदल करण्याची गरज नाही कारण iPhone आपोआप वेगवान 4G इंटरनेटसाठी Airtel APN सेटिंग्स शोधतो आणि कॉन्फिगर करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here