संदर कॅमेरा असलेला Vivo X90s ह्याच महिन्यात होईल लाँच, कॅमेरा सँपल्स आणि डेटचा खुलासा

Highlights

  • Vivo X90s 26 जूनला चीनमध्ये लाँच होईल.
  • कॅमेऱ्यात कंपनी विवो टेक्सचर कलर देणार आहे.
  • ह्यात Dimensity 9200 Plus चिपसेट दिला जाऊ शकतो.

विवोनं आपल्या Vivo X90s स्मार्टफोनची लाँच डेट कंफर्म केली आहे. हा डिवाइस येत्या 26 जूनला चीनमध्ये लाँच होणार आहे. कंपनी वाइस प्रेजिडेंटनं लाँच डेटसह फोनमध्ये मिळणाऱ्या कॅमेऱ्याचे काही इमेज सँपल्स देखील शेयर केले आहेत ज्यातून फोटो क्वॉलिटी दाखवण्यात आली आहे. तुम्ही पुढे हे सँपल्स आणि सविस्तर माहिती वाचू शकता.

Vivo X90s मध्ये मिळेल असा कॅमेरा

विवोचे वाइस प्रेसिडेंट आणि प्रोडक्ट स्ट्रेटजीचे जनरल मॅनेजर Jia Jingdong ह्यांनी Vivo X90s कॅमेरा सँपल्स शेयर केले आहेत. हे सँपल्स मायक्रो ब्लॉगिंग साइट Weibo वरून समोर आले आहेत. डिवाइसमध्ये दमदार फोटोग्राफी एक्सपीरियंस मिळेल असं सांगण्यात आलं आहे. Jia Jingdon नुसार ह्याआधी X-सीरीजमध्ये 2 मुख्य कलर एक्सप्रेशन दिले जात होते. ज्यात विविड कलर आणि Zeiss च्या नॅचरल कलर्सचा समावेश होता. परंतु आता कंपनी विवो टेक्सचर कलर देखील जोडणार आहे. जो क्लासिक फिल्म कॅमेऱ्यातून प्रेरणा घेतो.

Vivo X90s कॅमेरा सँपल्स

तुम्ही फोनमधून काढलेले फोटोज पाहू शकता की सर्व पिक्चर्स खूप सुंदर आहेत. इमेज मध्ये प्रत्येक डिटेल स्पष्ट दिसत आहे. ज्यात वर सांगितलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर स्पष्ट दिसत आहे. जर तुम्ही फोटोग्राफी प्रेमी असाल तर हा कॅमेरा तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Vivo X90s स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : लीकनुसार Vivo X90s मध्ये कर्व एज डिस्प्ले असेल. डिस्प्ले साइज 6.78 इंच ठेवली जाईल. हा डिस्प्ले AMOLED असेल आणि ह्यात 1260 x 2800 पिक्सल फुल एचडी + रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये Dimensity 9200 Plus चिपसेट दिला जाऊ शकतो. ह्याचे इतर फीचर्स Vivo X90 सारखे असू शकतात.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत फोनमध्ये 12 जीबी पर्यंत एलपीडीडीआर 5एक्स रॅम आणि 512 जीबी पर्यंत यूएफएस 4.0 स्टोरेज मिळेल.
  • कॅमेरा : Vivo X90s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा लेन्स असण्याची अपेक्षा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : हा मोबाइल फोन 100W चार्जिंग आणि 4,810mAh बॅटरीसह येईल.
  • कनेक्टिव्हिटी : ह्यात Wi-Fi 7 कनेक्टिव्हिटी, ड्युअल सिम, ब्लूटूथ सारखे फीचर्स देखील मिळतील.
  • OS : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित OriginOS 3.0 वर रन चालेल.
  • सुरक्षा : सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here