स्वस्त किंमतीत लवकर लाँच होऊ शकतो Vivo Y03, डिझाईन, स्पेसिफिकेशन, किंमत झाली लीक

Highlights

  • Vivo Y03 ला लवकर अनेक मार्केटमध्ये सादर केले जाऊ शकते.
  • यात MediaTek Helio G85 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • हा 6.56-इंचाच्या IPS LCD एचडी+ पॅनलसह असू शकतो.

विवो आपल्या नवीन बजेट स्मार्टफोन Vivo Y03 ला लवकर अनेक मार्केटमध्ये आणण्याची की तयारी करत आहे. हा एनबीटीसी सर्टिफिकेशनवर आला आहे. तसेच, आता फोन रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन लीकमध्ये समोर आले आहेत. सांगण्यात आले आहे की हा MediaTek Helio G85 चिपसेट, 6.56 मोठा डिस्प्ले, 128 जीबी पर्यंत स्टोरेज सारख्या अनेक फिचर्ससह असू शकतो. चला, पुढे माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y03 डिझाईन (लीक)

  • Vivo Y03 फोनबद्दल नवीन लीक Appuals ने शेअर केले आहेत. ज्यात स्पेसिफिकेशन आणि डिझाईन समोर आले आहेत.
  • डिझाईननुसार Vivo Y03 मध्ये फ्लॅट, मॅट-फिनिश बॅक पॅनल दिसतो. फोनच्या वरती डाव्या साईडवर कार्नरमध्ये ड्युअल कॅमेरा यूनिट आणि LED फ्लॅश पाहायला मिळतो. कॅमेरा लेन्सला कव्हर करण्यासाठी गोल्डन रिंग देण्यात आली आहे.
  • तुम्ही खाली फोटोमध्ये पाहू शकता की फोनला हिरव्या आणि काळ्या रंगाच्या ऑप्शनमध्ये शेअर करण्यात आले आहे. म्हणजे की या दोन्ही रंगामध्ये एंट्री मिळू शकते.
  • स्मार्टफोनचा फ्रंट पाहता यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी टिअरड्रॉप नॉच डिझाईन देण्यात आले आहे.

Vivo Y03 ची किंमत (लीक)

नुकत्याच आलेल्या लीक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की नवीन Vivo Y03 लाँचच्या वेळी मात्र 100 डॉलर म्हणजे की भारतीय किंमत चलनानुसार जवळपास 8,280 रुपयांमध्ये येऊ शकतो. आता पाहायचे आहे की ब्रँड कधी आणि केव्हा कोणती घोषणा करेल.

Vivo Y03 चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले: लीकनुसार Vivo Y03 मध्ये 6.56-इंचाचा IPS LCD एचडी+ रिजॉल्यूशन असलेला पॅनल मिळू शकतो. यावर 90Hz रिफ्रेश रेट मिळण्याची चर्चा आहे.
  • प्रोसेसर: Vivo Y03 मोबाईल फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी85 प्रोसेसर लावला जाऊ शकतो. ही एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे ज्याचा उपयोग स्वस्त फोनमध्ये केला जातो.
  • स्टोरेज: फोनसाठी 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 4 जीबी एक्सटेंडेड रॅम फिचर पण दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: Vivo Y03 मध्ये बॅक पॅनलवर 13MP चा प्रायमरी सेन्सर आणि एक सेकंडरी 0.08MP QVGA लेन्स लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी तुम्हाला 5MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असणार आहे ज्याला चार्ज करण्यासाठी USB-C पोर्टच्या माध्यमातून 15W चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.
  • आणखी: Vivo Y03 मध्ये धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग, ड्युअल सिम 4जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात.
  • ओएस: मोबाईलमध्ये युजर्सना लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित फनटच OS 14 वापरण्याची संधी मिळू शकते.

Vivo Y03 एनबीटीसी लिस्टिंग

स्मार्टफोनला NBTC सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर V2332 मॉडेल नंबर आणि Vivo Y03 नावाने दिसला आहे. लिस्टिंगमध्ये नवीन विवो स्मार्टफोन एलटीई कनेक्टिव्हिटीला सपोर्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आणखी कोणतीही माहिती स्पेसिफिकेशन समोर आलेले नाहीत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here