Vivo Y27 5G दिसला वेबसाइटवर; लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.
  • फोनमध्ये 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • ह्या डिवाइसमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo Y78 5G स्मार्टफोन सिंगापूर बाजारात सादर केला होता. आता कंपनी आपल्या वाय सीरिजमध्ये आणखी एक हँडसेट जोडण्याची तयारी करत आहे. कारण ह्या सीरिजमधील Vivo Y27 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर V2248 सह अलीकडेच गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट करण्यात आला होता.

Vivo Y27 5G दिसला NCC वर

आता विवोचा आगामी स्मार्टफोन Vivo Y27 5G मॉडेल नंबर V2248 सह नॅशनल सर्टिफिकेशन कॉर्पोरेशन ह्या सर्टिफिकेशन्स वेबसाइटवर दिसला आहे. सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून ह्या स्मार्टफोनच्या लाइव्ह इमेजेस समोर आल्या आहेत. पुढे आम्ही ह्याची सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाईनचा झाला खुलासा

  • इमेजेसमधून Vivo Y27 5G स्मार्टफोनच्या ग्रीन कलरचा ऑप्शन समोर आला आहे.
  • ह्या आगामी विवो फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल.
  • Vivo Y27 5G स्मार्टफोन फ्लॅट एज डिजाईनसह बाजारात येईल आणि ह्यात उजवीकडे साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.
  • मागील पॅनलवर फोनचा आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल, ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश असेल.
  • एनसीसी लिस्टिंगमधून स्मार्टफोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल हे समजलं आहे. तसेच जोडीला V4440L0A1-US मॉडेल नंबरसह चार्जर दिला जाऊ शकतो.
  • सर्टिफिकेशन डॉक्युमेंटनुसार ह्या फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल जी 4900एमएएच कपॅसिटीसाठी रेट करण्यात आली आहे आणि हिचा मॉडेल नंबर B-Z5 आहे.
  • फोनच्या वरच्या पॅनलवर सेकंडरी मायक्रोफोन आणि सिम कार्ड ट्रे दिला जाईल
  • तर खालच्या पॅनलवर यूएसबी सी पोर्ट, 3.5एमएम जॅक, स्पीकर ग्रील आणि मुख्य मायक्रोफोन मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here