Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला सर्वात पातळ 5G फोन Xiaomi Mi 11 Lite, किंमत पण आहे कमी

शाओमीने सोमवारी चीनमध्ये आयोजित इवेंट मध्ये आपल्या Mi 11 सीरीजमध्ये नवीन फोन्स सादर केले आहेत. या फोनमध्ये Mi 11 Ultra 5G, Mi 11 Pro 5G आणि Mi 11 Lite 5G चा समावेश आहे. पण, कंपनीने चीन सोबतच ग्लोबल मार्केटमध्ये Mi 11i आणि Mi 11 Lite 4G पण सादर केले आहेत. Mi 11 Lite च्या 4G आणि 5G व्हेरिएंट बद्दल बोलायचे झाले तर या दोघांच्या किंमत, सेल्फी कॅमेरा आणि प्रोसेसरमध्ये फरक आहे. पुढे तुम्हाला मी 11 लाइटच्या दोन्ही वेरिएंटची फुल स्पेसिफिकेशनसह माहिती देत आहोत. (xiaomi mi 11 lite 5g 4g launch price specification)

Mi 11 Lite 5G/4G ची डिजाइन आणि डिस्प्ले

लुकच्या बाबतीत फोनच्या 5G/4G वेरिएंटमध्ये कोणताही फरक दिसत नाही. दोन्ही मॉडेलमध्ये लेफ्ट कॉर्नरवर फ्लॅट डिस्प्लेसह होल-पंच मिळेल. फ्लॅट डिस्प्ले झाल्यानंतर पण फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. तसेच, मागे चौकोनी आकारात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह 6.55 इंचाचा फुल-एचडी + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले HDR10 + आणि डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. तसेच 4G मॉडेलमध्ये Gorilla Glass 5 आहे आणि 5G मॉडेलमध्ये Gorilla Glass 6 चे प्रोटेक्शन आहे.

हे देखील वाचा : एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, 5G आणि Samsung कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Mi 11 Ultra 5G

Mi 11 Lite 5G/4G ची प्रोसेसिंग पावर वेगळी

याव्यतिरिक्त फोनच्या 5G वेरिएंट मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 780G SoC देण्यात आला आहे जो एड्रिनो 642 GPU सपोर्टसह येतो. इतकेच नव्हे तर हा प्रोसेसर 700 सीरीजचा पहिला प्रोसेसर आहे जो 5nm प्रोसेसवर चालतो. तसेच, फोनचा 4G मॉडेल कंपनीने Qualcomm Snapdragon 732G सह सादर केला आहे. आशा आहे कि भारतात फोन 4G मॉडेलसह लॉन्च होऊ शकतो, त्यामुळे कंपनीने याची किंमत कमी ठेवेल.

Mi 11 Lite 5G/4G चा सेल्फी कॅमेरा

फोटोग्राफी पाहता Mi 11 Lite 5G आणि 4G मध्ये 64-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर आणि 5-मेगापिक्सल मॅक्रो सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत. 5G वेरिएंटमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर दुसरीकडे 4G वेरिएंटमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5G ची पावर आणि पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला Mi 11 Pro, Realme ला आव्हान देण्याची पूर्ण तयारी

Mi 11 Lite 5G/4G ची बॅटरी आणि कनेक्टिविटी

Mi 11 Lite कंपनीचा सर्वात पातळ 5G फोन आहे. याचे माप 160.53 mm x 75.72 mm x 6.81 mm आणि वजन फक्त 159 ग्राम आहे. फोनचा 4G आणि 5G वेरिएंट दोन्ही Android 10 बेस्ड MIUI 12 कस्टम स्किनवर चालतात. Mi 11 सीरीजचा सर्वात परवडणारा फोन आहे, ज्यात 4,250mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

किंमत

Mi 11 Lite 4G च्या 6GB+64GB वेरिएंटची किंमत €299 (जवळपास 25,620 रुपये) आहे. तर, फोनचा 6GB+128GB वेरिएंटपण सादर केला आहे. पण अजूनतरी याची किंमत समोर आली नाही. Mi 11 Lite 5G च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,299 (जवळपास 25,500 रुपये) आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,599 (जवळपास 28,800 रुपये) आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here