भारतात लॉन्च होईल 6-इंच बेजल लेस डिस्प्ले वाला वीवो वाय71आय, बघा स्पेसिफिकेशन्स

टेक कंपनी वीवो ने एप्रिल मध्ये भारतात आपले स्मार्टफोंस वाढवत असताना वाय सीरीज मध्ये वाय71 लॉन्च केला होता. कमी बजेट वाल्या या स्मार्टफोन नंतर आता वीवो ने या सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. 91मोबाइल्‍सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच भारतीय बाजारात वाय71आय स्मार्टफोन सादर करेल. हा फोन वीवो वाय71 चा छोटा वेरिएंट आहे जो काही दिवसांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

91मोबाईल्सला रिटेल बाजारातील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की वीवो लवकरच भारतीय बाजारात वाय71आय स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. वीवो वाय71आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला जाईल तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले मिळेल.

वीवो वाय71आय कंपनी द्वारा 2जीबी रॅम सह सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर केला जाईल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात येईल तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

वीवो वाय71आय डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देतो. सिक्योरिटी साठी फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी यात 3,360एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वाय71आय थोड्याच दिवसांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध होईल. फोन ची किंमत किती असेल याची अधिकृत माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here