OnePlus 7 Pro ची प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या कुठे करावा बुक आणि पद्धत काय आहे

जेव्हा पासून वनप्लस ने घोषणा केली आहे कि कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप ​​कीलर आणणार आहे तेव्हापासूनच फक्त टेक विश्वात नव्हे तर स्मार्टफोन यूजर्स मध्ये पण उत्सुकता आहे. वनप्लसने सांगतले आहे कि कंपनी येत्या 14 मे ला एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंटच्या मंचावरून नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus 7 Pro स्मार्टफोन समोर येईल. चर्चा अशी आहे कि कंपनी यावेळी दोन फोन लॉन्च करेल आणि यात OnePlus 7 पण असेल. वनप्लस फॅन्स साठी खुशखबर अशी आहे कि आज पासून हे नवीन डिवाईस इंडिया मध्ये प्री-बुकिंग साठी पण उपलब्ध झाले आहेत.

अशी करा प्री-बुकिंग
वनप्लसचे आगामी डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन वर प्री-बुकिंग साठी सादर केले गेले आहेत. विशेष म्हणजे तिथे फक्त OnePlus 7 Pro प्री-बुकिंग केली जात आहे. फोनच्या प्री-बुकिंग साठी यूजरला 1,000 रुपये द्यावे लागतील. हि प्री-बुकिंग अमाउंट फोन विकत घेताना त्याच्या किंमतीतून कमी केली जाईल, सोबतच OnePlus 7 Pro प्री-बुक करणाऱ्या यूजर्सना 15,000 रुपयांचे फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट बेनिफिट पण दिले जात आहेत.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह लॉन्च होईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 Pro

ऑफलाइन प्लेटफॉर्म वर OnePlus 7 Pro बुक करणाऱ्या यूजर्स साठी फोनची प्री-बुकिंग 8 मे पासून सुरु केली जाईल. वनप्लस स्टोर सोबत क्रोमा आणि रिलायंस ​स्टोर्स वर जाऊन हा फोन प्री-बुक करता येईल. ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर प्री-बुकिंग साठी यूजर्सना 2,000 रुपये द्यावे लागतील जे फोनच्या किंमतीत एडजस्ट केले जातील.

लॉन्च डिटेल
OnePlus येत्या 14 मे ला बेंगलुरु मध्ये ईवेंटचे आयोजन करेल ज्यात कंपनीचे नवीन डिवाईस OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च केले जातील. हा ईवेंट 14 मे रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याचवेळी वनप्लस इंडिया सोबत यूएस आणि यूरोप मध्ये लॉन्च ईवेंट आयोजित करेल. कंपनी एक साथ जगातील अनेक देशांमध्ये आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. भारतात फोनचा सेल कधी सुरु होईल, यासाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

हे देखील वाचा: Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान

स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro दोन्ही फोन 5G कनेक्टिविटी सह येतील. रिपोर्टनुसार OnePlus 7 आणि 7 Pro नावाने लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन 2 स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च केले जातील. फोनच्या बेस वेरियंट मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, तसेच दुसऱ्या वेरियंट मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हे फोन क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च होतील.

लीक नुसार OnePlus 7 Pro च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल, यात 3X ऑप्टिकल झूम असेल. तसेच फोनच्या मागील तिसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. OnePlus 7 च्या कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर एफ/1.7 वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो. OnePlus 7 किंवा OnePlus 7 Pro पैकी एका मॉडेल मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी असू शकते जी 20 वाट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here