Vodafone ने पुन्हा आणला 20 रुपयांचा शानदार प्लान, मिळेल हि खास सर्विस

टेलीकॉम क्षेत्रात चालू असलेल्या डेटा वॉर मध्ये Vodafone ने आपला जुना 20 रुपयांचा टॉक टाइम प्लान पुन्हा एकदा मार्केट मध्ये सादर केला आहे. यावेळी या रिचार्ज पॅक मध्ये आधी पेक्षा जास्त बेनिफिट्स मिळत आहेत. कंपनी या पॅक मध्ये फुल टाक टाइम सोबत 28 दिवसांची वॅलिडिटी एक्सटेंशनची पण सुविधा देत आहे.

विशेष म्हणजे कंपनीच्या मिनिमम रिचार्ज स्कीम मध्ये आल्यानंतर सर्व प्रीपेड यूजर्सना कंपनीच्या सर्विसेज चालू ठेवण्यासाठी दार महिन्याला रिचार्ज करावा लागतो. आता पर्यंत वोडाफोन कडे 24 व 35 रुपयांचे रिचार्ज होते. आता यूजर्स या 20 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करून पण आपल्या नंबर वर सर्विसेज चालू ठेऊ शकतात.

वोडाफोनने अलीकडेच आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी वोडाफोन रीवार्ड्स प्रोग्राम लॉन्च केला होता. हा प्रोग्राम लिमिटेड टाइम साठी आहे. या प्रोग्राम मध्ये प्रीपेड सब्सक्राइबर्सना प्रत्येक रीचार्ज वर निश्चित बक्षीस दिले जाईल. हा प्रोग्राम कंपनीने ‘हर रीचार्ज पे इनाम ऑफर’ नावाने सादर केला आहे. यासाठी यूजर्सना रीचार्ज करण्यासाठी 72 तासांच्या आत रिवार्ड क्लेम करावा लागतो. जर 72 तासांच्या आत रिवार्ड क्लेम नाही केला तर मिळणारा फायदा यूजर्सना मिळणार नाही.

यूजर्स जितक्या जास्त किंमतीचा प्रीपेड रीचार्ज करतील तितके जास्त रिवार्ड मिळेल. वोडाफोन रिवार्ड्स प्रोग्राम सर्वात आधी टेलीकॉम टॉक वेबसाइट वर दिसला होता. हि ऑफर कंपनीच्या वेबसाइट वर लिस्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here