टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये वोडाफोन आयडिया 5G लाँच बाबत जियो आणि एयरटेलच्या मागे आहे. परंतु दुसरीकडे कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. अलीकडेच तीन नवीन रिचार्ज सादर केल्यानंतर विआयनं 4 नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनी ह्या चारही रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे.
फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध रिचार्ज
कंपनीच्या चार नवीन रिचार्ज प्लॅन्समध्ये Rs 198 plan, Rs 204 plan, Rs 224 आणि Rs 232 plans चा समावेश आहे. विशेष म्हणजे चारही प्लॅन सध्या फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्समध्ये मिळणार्या ऑफर्स बाबत सर्वकाही.
- Vi चा 198 रुपयांचा रिचार्ज: 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 500MB डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर ह्यात 198 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जात आहे.
- Vi चा 204 रुपयांच्या रिचार्ज: 204 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 204 रुपयांचा लिमिटेड टॉकटाइम आणि एक महिन्याच्या वैधतेसह 500MB डेटा मिळत आहे. तर प्लॅनसह कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल.
- Vi चा 224 रुपयांचा रिचार्ज: या रिचार्जमध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच ह्यात अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह एकूण 4GB डेटा दिला जात आहे. परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
- Vi चा 232 रुपयांचा रिचार्ज: 224 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच ह्यात देखील फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 4जीबी डेटा मिळत आहे. परंतु, प्लॅनची वैधता एक महिना आहे.
विआय 5G ची तयारी सुरू
काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G सादर करण्यासाठी आपल्या पार्टनर्ससह काम करत आहे” आणि कंपनी लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.