हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन आणि 75GB अतिरिक्त डेटा फ्री; असा प्लॅन जियो-एयरटेलकडेही नाही

Vodafone Idea (Vi) काही दिवसांपूर्वी आपल्या फेस्टिव ऑफर अंतर्गत तीन प्रीपेड प्लॅनवर 75GB पर्यंत डेटा मोफत देत होती. कंपनीनं ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सादर केली होती. परंतु वोडाफोन आयडियानं आता पुन्हा एकदा ही ऑफर प्रीपेड युजर्ससाठी सदर केली आहे. यावेळी तीन ऐवजी फक्त दोन प्लॅन्सवर मोफत डेटा दिला जात आहे. जर तुम्ही देखील वोडाफोन आयडिया युजर्स असाल तर मोफत 75GB पर्यंत डेटा मिळवण्यासाठी तुम्ही 1449 रुपये आणि 3099 रुपयांच्या प्लॅन पैकी एकाची निवडू करू शकता. पुढे आम्ही तुम्हाला या ऑफरची संपूर्ण माहिती दिली आहे.

या प्लॅनवर मिळत आहे ऑफर

वोडाफोन आयडियाच्या दोन प्रीपेड प्लॅनवर ही ऑफर मिळत आहे, याची घोषणा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून केली आहे. कंपनीच्या दोन प्लॅन्सनं रिचार्ज केल्यास युजर्सना बोनस म्हणून 75GB पर्यंत डेटा मोफत दिला जाईल. कंपनी 1449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB बोनस डेटा देत आहे. तर, 3099 रुपयांच्या प्लॅनसह 75GB बोनस डेटा मिळत आहे. ही ऑफर त्या ग्राहकांसाठी चांगली आहे ज्यांना डेली डेटा वापरून देखील जास्त डेटाची आवश्यकता असते.

जाणून घ्या कोणत्या प्लॅनमध्ये मिळतायत कोणते बेनिफिट्स

1) Vi चा 1449 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 1449 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बद्दल बोलायचं तर यात ग्राहकांना 50जीबी एक्स्ट्रा डेटा व्यतिरिक्त डेली 1.5जीबी Data दिला जात आहे, हिशोब केल्यास या प्लॅनमध्ये एकूण 320 जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर या अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतील. या रिचार्जमध्ये 180 दिवसांची वॅलिडिटी देण्यात आली आहे. तर ऑनलाइन एंटरटेनमेंट हव्या असणाऱ्या ग्राहकांसाठी विआय मूव्ही आणि टीव्ही विआयपीचा अ‍ॅक्सेस देखील मिळत आहे.

प्लॅनमधील बिंज ऑल नाइट फिचरच्या मदतीनं रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान वापरला जाणारा डेटा डेली डेटा मधून कट केला जात नाही, म्हणजे या काळात अमर्याद डेटा मोफत वापरता येतो. तर विकेंड डेटा रोल आउट फिचरमुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान डेली डेटा लिमिट मधील उर्वरित डेटा विकेंडला वापरता येतो. तसेच डेटा डिलाइट्समध्ये तुम्हाला दरमहिन्याला 2 जीबी डेटा बॅकअप म्हणून मिळतो.

2) Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन

जर तुम्हाला दीर्घ वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर वोडाफोन आयडियाचा 3099 रुपयांच्या रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट आहे. यात युजर्सना 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह 2GB डेली डेटा, रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. तसेच रिचार्जमध्ये 75GB एक्स्ट्रा डेटासह विआय हीरो अनलिमिटेड बेनिफिट्स, विआय मुव्हीज आणि टीव्ही विआयपी, एक वर्षाचे डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल सब्सस्क्रिप्शन आणि 75GB बोनस डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्सचा फायदा दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here