3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर

Photo by Ketut Subiyanto from Pexels

इंडियन टेलीकॉम सेक्टर मध्ये नेहमीच अशी चर्चा होत असते कि जियो, वोडाफोन आयडिया आणि एयरेटल पैकी कोणाकडे बेस्ट प्रीपेड प्लान्स आहेत. याबाबत आम्ही पण तुम्हाला एकच किंमत आणि बेनिफिट्स सह येणारे तिन्ही कंपन्यांच्या प्लान्सची तुलना करून तुम्हाला कोणत्या प्लान मध्ये जास्त फायदा मिळत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. डेटाच्या बाबतीत अनेकदा रिलायंस जियोचा विजय होतो. पण दुसरीकडे वोडाफोन-आयडियाकडे एक असा जबरदस्त प्रीपेड प्लान आहे, ज्यात युजर फक्त 2 रुपये 8 पैश्यात रोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह OTT सब्सक्रिप्शनचा लाभ मिळतो. चला जाणून घेऊया या प्लान बाबत.

असा आहे प्लान

आम्ही ज्या प्लान बाबत बोलत आहोत तो वोडाफोन-आयडिया (Vi) पॉप्युलर रिचार्ज 699 रुपयांचा आहे. या प्लान मध्ये युजर्स अनेक लाभ मिळत आहेत. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह रोज 4जीबा डेटा सह सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग आणि Vi Movies & TV ऍपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा : Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी

अश्याप्रकारे मिळेल 2.80 रुपयांमध्ये डेली 1जीबी डेटा

वोडाफोन-आयडियाच्या या प्लान मध्ये युजर्सना डबल डेटाचा लाभ मिळतो. त्यामुळे 84 दिवसांच्या प्लान मध्ये एकूण 336 जीबी डेटा युजर्सना मिळतो. म्हणजे रोजच्या हिशोबाने फक्त 2 रुपये 8 पैशांमध्ये 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह अजून अनेक सुविधा मिळत आहेत.

Jio कडे नाही उत्तर

जियो 599 रुपयांमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह प्रीपेड प्लान ऑफर करत आहे, ज्यात युजर्सना रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये युजर्सना एक जीबीसाठी 3.56 रुपये द्यावे लागतील.

हे देखील वाचा : रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट

Vi ने दिल्ली मध्ये बंद केली 3G सिम सर्विस

वोडाफोन-आयडिया (Vi) ने 15 जानेवारी पासून दिल्ली मध्ये आपली 3जी सिम सर्विस बंद केली आहे. Vodafone Idea (Vi) ने सर्विस बंद करण्याच्या घोषणेनंतर 3जी सिम युजर्सना मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here