Meta चा CEO Mark Zuckerberg नं अखेरीस WhatsApp वर बहुप्रतीक्षित फीचर रोलआउट केला आहे. हा व्हॉट्सअॅपचा नवीन ‘Edit Messages’ फीचर आहे. 22 मेला मार्कनं हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. तसेच माहिती दिली आहे की ह्या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही ‘टायपो’ सह पाठवलेले WhatsApp Chat 15 मिनिटांच्या आत edit करता येतं.
Mark Zuckerberg नं आपल्या Facebook पोस्टच्या माध्यमातून WhatsApp च्या ह्या नवीन ‘Edit Messages’ फीचरची माहिती दिली. त्याने नवीन फीचरची घोषणा एक पोस्टर शेयर करून केली आहे. ह्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे की ‘चुकीचा टाइप केलेला मेसेज’ तुम्ही Send केल्यानंतर एडिट करू शकता.
त्याचबरोबर मार्कनं माहिती दिली आहे की टायपोसह गेलेले मेसेज एडिट करण्यासाठी युजर्सकडे 15 मिनिटांची वेळ असेल. 15 मिनिटांनंतर तुम्हाला एडिट फीचरचा फायदा घेता येणार नाही. फीचरच्या घोषणेसह एक पोस्टर पण शेयर करण्यात आला आहे, ज्यात एडिट मेसेजचं उदाहरण दिसत आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे की ‘Beast of luck’ मेसेज टायपोसह पाठवण्यात आला आहे, जो नंतर ‘Best Of luck’ सह एडिट करण्यात आला आहे.
WhatsApp नं देखील नवीन फीचरच्या रोलआउटची माहिती देखील ऑफिशियल केली होती. व्हॉट्सअॅपनं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलच्या माध्यमातून कंफर्म केलं की लवकरच व्हॉट्सअॅप एडिट फीचर रोलआउट होणार आहे. त्याचबरोबर एक छोटा टीजर व्हिडीओ देखील शेयर केला होता. ह्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे की हे नवीन एडिट फीचर इंग्रजीसह इतर भाषांमधील मेसेज देखील एडिट करू शकेल.
— WhatsApp (@WhatsApp) May 21, 2023
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज एडिट कसा करायचा
- एकदा मेसेज पाठवल्यावर तुमच्याकडे 15 मिनिटांची विंडो असेल.
- ह्या 15 मिनट मिनिटांत तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता.
- सर्वप्रथम सेंड मेसेजवर लॉन्ग प्रेस करा.
- लॉन्ग प्रेस नंतर Edit Message चा ऑप्शन दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यावर WhatsApp मेसेज अपडेट करण्याची नवीन विंडो येईल.
- त्यानंतर तुमची सेंड मेसेज एडिट करू शकाल
व्हॉट्सअॅप चॅट लॉक फिचर
WhatsApp नं अलीकडेच चॅट लॉक फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स कोणतंही खाजगी किंवा महत्वाचं चॅट लॉक करू शकतील. ह्याआधी फक्त संपूर्ण व्हॉट्सअॅप लॉक करण्याची सुविधा इंस्टंट मेसेजिंग अॅपवर होती. आता नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही विशिष्ट चॅटवर देखील लॉक लावू शकता. हे फिचर युजर्सच्या प्रायव्हसी व सिक्योरिटीसाठी आवश्यक आहे.