6000mAh बॅटरी असलेला Vivo T3x 5G फोन भारतात लाँच, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा पण कमी

कमी बजेटमध्ये दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या युजर्ससाठी विवो नवीन भेटवस्तू घेऊन आला आहे. ब्रँडने भारतीय बाजारात आपल्या T3 सीरिज प्रोडक्टचा पोर्टफोलियो वाढवत Vivo T3x 5G फोन लाँच केला आहे. हा 15,000 रुपयांपेक्षा पण कमीमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 6.72 इंचाची मोठी स्क्रीन आणि 6000mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फिचर्स प्रदान करत आहे. चला, याची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Vivo T3x 5G ची किंमत आणि उपलब्धता

 • विवोचा नवीन मोबाईल Vivo T3x 5G भारतीय बाजारात तीन ऑप्शनमध्ये आला आहे.
 • Vivo T3x 5G च्या 4GB रॅम +128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. तर 6GB रॅम +128 जीबी मॉडेल 14,999 रुपयांचा आहे. तसेच, टॉप मॉडेल 8 जीबी रॅम +128 जीबी ऑप्शन 16,499 रुपयांचा आहे.
 • लाँच ऑफर पाहता ब्रँड डिव्हाईसवर 1,500 रुपये पर्यंतचा बँक डिस्काऊंट प्रदान करत आहे.
 • बँक ऑफरसह डिव्हाईसचे बेस मॉडेल 12,499 रुपये, मिड मॉडेल 13,499 आणि टॉप ऑप्शन 14,999 रुपयांमध्ये मिळेल.
 • विवोच्या या नवीन स्मार्टफोनची सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल आऊटलेट्सवर 24 एप्रिलपासून सुरु होईल.
 • कलर ऑप्शन पाहता Vivo T3x 5G सेलीस्टियल ग्रीन आणि क्रिम्सन ब्लिस सारख्या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे.

Vivo T3x 5G चे स्पेसिफिकेशन

 • 6.72 इंचाची एचडी प्लस डिस्प्ले
 • स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर
 • 8GB रॅम +128GB स्टोरेज
 • 8GB व्हर्च्युअल रॅम
 • 50MP ड्युअल रिअर कॅमेरा
 • 6000mAh ची बॅटरी
 • 44 वॉट फास्ट चार्जिंग
 • आयपी 64 रेटिंग
 • अँड्रॉईड 14 ओएस

डिस्प्ले: नवीन मोबाईल Vivo T3x 5G मध्ये युजर्सना 6.72 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रेजोल्यूशन मिळतो. हेच नाही तर स्क्रीनवर पंच होल डिझाईन सादर करण्यात आली आहे.

प्रोसेसर: प्रोसेसर पाहता ब्रँडने युजर्सना दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी Vivo T3x 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर लावला आहे. हा चार नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो. ज्यात 2.2GHz ची हाई क्लॉक स्पीड मिळते.

स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी Vivo T3x 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात लाँच झाला आहे. ज्यात 4GB रॅम +128GB स्टोरेज, 6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +128GB ऑप्शनचा समावेश आहे. तसेच डिव्हाईसमध्ये रॅमला वाढविण्यासाठी व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स जवळपास 16 जीबी पर्यंत रॅमचा वापर करू शकतात.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये युजर्सना ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा लावण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी युजर्सना 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळेल.

बॅटरी: Vivo T3x 5G फोनची बॅटरी याला आणि पण पावरफुल बनवते, कारण यात 6000mAh ची मोठ्या बॅटरीचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचबरोबर याला लवकर चार्ज करण्यासाठी कंपनीने 44 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

इतर: इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर Vivo T3x 5G डिव्हाईस आयपी 64 रेटिंग, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 4G, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ सारख्या अनेक ऑप्शससह येतो.

वजन आणि डायमेंशन: फोनचे वजन आणि डायमेंशन पाहता हा मात्र 7.99mm आणि 199 ग्रॅमचा आहे.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo T3x 5G मोबाईल अँड्रॉईड 14 आधारित Fun Touch OS 14 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here