व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी सतत आपल्या अॅपवर फीचर अपडेट करत असते. आता बातमी आली आहे की मेसेजिंग अॅप आपल्या iOS युजर्ससाठी मेसेज ट्रांसक्रिप्ट फीचर (Voice Message Transcripts) सादर करणार आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून फोनमध्ये येणारे व्हॉइस मेसेज आपोआप इंग्रजीमध्ये ट्रांसक्राइब करेल जेणेकरून युजर तो मेसेज चॅटप्रमाणे वाचू शकता. सध्या हे फीचर काही iOS बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध झालं आहे.
हे फिचर येत्या काही आठवड्यांमध्ये सामान्य युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतं. हे फीचर वापरण्यासाठी TestFlight अॅपवर iOS 23.9.0.70 WhatsApp बीटा अपडेट करण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्येक बीटा टेस्टरकडे येईलच असं नाही. फीचर स्पॉट करणाऱ्या WABetaInfo नुसार, येत्या काही आठवड्यांमध्ये हे फीचर आणि टेस्टर्ससाठी रोल आउट होईल. हे देखील वाचा: क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह Redmi Note 12R Pro ची एंट्री; जाणून घ्या फीचर्स
नावावरून समजलं असेल की हे फीचर व्हॉइस मेसेज ट्रांसक्राइब करतो आणि टेक्स्ट व्हॉइस मेसेज बॉक्समध्ये दाखवतो. तुमच्या आवडीनुसार इंग्रजी भाषा बदलण्याचा ऑप्शन देखील असेल. यासाठी तुम्ही इंग्रजी (भारत) ची निवड करू शकता किंवा यूके, यूएस किंवा कॅनडामध्ये बदलू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये नंतर सर्चसाठी ट्रांसक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर
व्हॉइस मेसेज ट्रांसक्रिप्ट फीचर डिफॉल्ट पद्धतीनं ऑन राहील, परंतु ज्या युजर्सना हे फिचर वापरायचं नाही ते व्हॉट्सअॅप सेटिंग्स> चॅट्स> व्हॉइस मेसेज ट्रांसक्रिप्ट्सवर जाऊन हे डिसेबल करू शकतील. वर सांगितलंप्रमाणे सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये आहे आणि फक्त निवडक बीटा टेस्टर्सकडे उपलब्ध आहे.