Samsung Galaxy A71 च्या शानदार क्वाड कॅमेऱ्यामुळे हा ठरतो बेस्ट कॅमेरा फोन

अलीकडेच Samsung ने Galaxy A71 भारतीय बाजारात सादर केला आहे. या फोन मध्ये दमदार प्रोसेसर आणि मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनची स्टाइल पण लाजवाब आहे. हि सर्व वैशिष्ट्ये बघितल्या नंतर पण जर तुम्ही मला Samsung Galaxy A71 च्या सर्वात मोठ्या फीचरबाबत विचारले तर मी कॅमेऱ्याचे नाव घेईन. फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि याचा मेन कॅमेरा सेंसर 64-megapixel आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक Ultra Wide कॅमेरा, एक Macro कॅमेरा आणि एक Depth सेंसर मिळेल, Depth सेंसर पोर्टेट फोटोग्राफीचे काम करतो. याचा अर्थ असा आहे कि जर तुम्ही स्मार्टफोन फोटोग्राफर असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्द आहेत. जर कॅमेऱ्याचा विषय निघालाच आहे तर चला जाणून घेऊया कि का या फोनला याच्या सेग्मेंट मध्ये बेस्ट कॅमेरा फोन म्हटले जाते.

चार कॅमेऱ्यांची कमाल

Samsung Galaxy A71 मध्ये L-shaped क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सेंसर सोबतच सिंगल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. टेक्सचर्ड ग्रेडिंग फिनिश बॅक पॅनल वर कॅमेऱ्याची प्लेसमेंट अश्याप्रकारे आहे कि मागून हा फोन अजून सुंदर दिसतो.

फोनचा मेन कॅमेरा सेंसर 64-megapixel आहे जो 4K वीडियो रिकॉर्डिंग 30fps मध्ये करू शकतो. मेन कॅमेऱ्याचा अपर्चर F/1.8 आहे जो कमी प्रकाशात पण जास्त लाइट कॅप्चर करतो आणि यामुळे तुम्हाला रात्री पण चांगली फोटोग्राफी करता येते. तसेच कॅमेऱ्यासोबत PDAF सपोर्ट आहे जो फोटोग्राफी किंवा वीडियोग्राफी करताना फास्ट फोकस करू शकतो.

याचा 64-megapixel कॅमेरा तुम्हाला हाई-रेज्ल्यूशन वर फोटोग्राफीचा पर्याय देतो. तुम्ही शानदार डिटेलिंग सह पिक्चर कॅप्चर करू शकता. कॅमेरा इतका ताकदवान आहे कि तुम्ही आधी शूट करून नंतर आवश्यकतेनुसार फोटो क्रॉप केला तरी चांगली डिटेलिंग मिळेल. त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी खास Night Mode देण्यात आला आहे जो low-light कंडिशन मध्ये पण चांगल्या ब्राइटनेस आणि डिटेलिंग सह पिक्चर क्लिक करतो.

फोनचा दूसरा सेंसर 12-megapixel आहे आणि हा Ultra Wide सेंसर आहे. हा कॅमेरा फोटोग्राफी करताना 123 Degree फिल्ड ऑफ व्यू देतो जो जवळपास आपल्या डोळयांच्या फिल्ड ऑफ व्यू इतका आहे. यात 13mm लेंस सह Auto HDR फीचर सपोर्ट आहे जो तुम्हाला उत्तम फोटोग्राफी करण्यास मदत करतो. अर्थात तुम्ही एका फ्रेम मध्ये खूप काही फिट करू शकता.

Samsung Galaxy A71 चा तिसरा सेंसर 5-megapixel चा आहे आणि हा Macro कॅमेरा आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सब्जेक्टच्या जवळ जाऊन जवळपास 3.5cm अंतरावरून पण फोटोग्राफी करू शकता. तसेच याचा चौथा कॅमेरा 5-megapixel चा आहे जो डेफ्थ ऑफ फिल्ड यूनिट आहे. हा पोर्टेट शॉट घेण्याचे काम करतो. कॅमेऱ्यासह HDR आणि Live Focus mode सपोर्ट आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोटो घेण्याआधी किंवा नंतर ब्लर इफेक्ट अडजस्ट करू शकता.

कॅमेऱ्याची कमाल तुम्हाला वीडियो सेक्शन मध्ये पण दिसेल. यातील मेन सेंसर, अल्ट्रावाइड आणि सेल्फी कॅमेरा 4K वीडियो 30fps वर शूट करू शकतात. तसेच फोन मध्ये सुपर स्लोमोशन वीडियोचा पण ऑप्शन देण्यात आला आहे. Samsung Galaxy A71 मध्ये स्लो मोशन वीडियो 720p वर 240fps च्या दराने शूट केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त वीडियो मध्ये एक आणि फीचर आहे जो तुमच्या खूप कामाचा आहे. यात सुपर स्टडी शॉट देण्यात आला आहे जो 1080p वीडियो रिकॉर्डिंग करताना वीडियो स्टेबलाइजेशन देतो.

बेस्ट क्लास फीचर्स

कॅमेऱ्याची माहिती तुम्हाला मिळाली असलेच पण Samsung Galaxy A71 चे दुसरे फीचर्स पण कमी नाहीत. याच कारणांमुळे मिड रेंज सेग्मेंट मध्ये या फोनला एक शानदार फोन म्हणता येते. या फोन मध्ये तुम्हाला 6.7-Inch FHD+ sAMOLED Plus पंच-होल डिस्प्ले मिळेल. या Punch-Hole कटआउट वरच 32-Megapixel चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. चांगली बाब अशी आहे कि फ्रंट कॅमेऱ्यासह Slow-mo selfies देण्यात आली आहे. अर्थात आता तुमचा सोशल नेटवर्क पण आधीपेक्षा जास्त चमकेल.

डिजाइन आणि डिस्प्ले व्यतिरिक्त परफॉर्मेंस बद्दल बोलायचे तर तिथे पण हा फोन मागे नाही. या फोनला 8nm फॅब्रिकेशन वाले Qualcomm Snapdragon 730 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM मेमरी आणि 128GB इंटरनल स्टोरेज पण सोबत मिळेल. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही 512GB पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता.

सिक्योरिटीसाठी कंपनीने यात अडवांस टेक्नॉलॉजी दिली आहे. फोन मध्ये तुम्हाला In-Display फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल जो Samsung Knox सिक्योरिटी सह येतो. तसेच यात Samsung Pay पण उपलब्ध आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि जी 25W super-fast चार्जिंग सह येते. सर्वात खास बाब अशी म्हणता येईल कि हे सर्व फीचर्स फक्त 7.7mm स्लिम डिजाइन असलेल्या फोन मध्ये सामावून जातात.

निष्कर्ष

शेवटी बोलायचे तर तुम्ही बघू शकता कि Samsung Galaxy A71 असा फोन आहे जो कॅमेऱ्याच्या बाबतीत निराशा करत नाही मग फोटोग्राफी असो वा वीडियोग्राफी. तसेच फोनची डिजाइन, परफॉर्मेंस आणि दीर्घ बॅटरी लाइफ याला एक कंप्लीट पॅकेज बनवते जो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here