
Nubia नं चीनमध्ये 24 जीबी रॅमसह जगातील पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन REDMAGIC 8S Pro सीरीज अंतगर्त लाँच करण्यात आला आहे. ह्या सीरीजमध्ये कंपनीनं REDMAGIC 8S Pro आणि REDMAGIC 8S Pro+ डिवाइस लाँच केले आहेत. मोबाइलमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्समुळे दमदार गेमिंग एक्सपीरियंस मिळेल. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही हँडसेटचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
RedMagic 8S Pro सीरीज स्पेसिफिकेशन्स
या सीरीजमधील RedMagic 8S Pro आणि RedMagic 8S Pro+ चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एक सारखे आहेत, फक्त स्टोरेज, बॅटरी आणि प्रोसेसरचा क्लॉक स्पीड वेगळा आहे.
डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 6.8-इंचाचा मोठा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 2480 x 1116 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच 960Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ,100 टक्के DCI-P3 कलर गमट सपोर्ट, 1300 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि 1440Hz PWM डिमिंग सपोर्ट देखील मिळतो.
RedMagic 8S Pro ची किंमत
- RedMagic 8S Pro च्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 3,999 म्हणजे सुमारे 45,400 रुपये आहे.
- डिवाइसचा 8GB + 256GB मॉडेल RMB 4,399 म्हणजे जवळपास 50,000 रुपयांचा आहे.
- 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट RMB 4,799 म्हणजे जवळपास 54,500 रुपयांचा आहे.
- 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल RMB 5,499 म्हणजे जवळपास 62,400 रुपयांना मिळेल.
RedMagic 8S Pro + ची किंमत
- RedMagic 8S Pro+ चा 16GB रॅम + 256GB स्टोरेज RMB 5,499 म्हणजे सुमारे 62,500 रुपयांचा आहे.
- 16GB रॅम + 512GB स्टोरेजची किंमत RMB 5,799 सुमारे 65,800 रुपये आहे.
- 16GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत RMB 5,699 म्हणजे सुमारे 64,700 रुपये आहे.
- 16GB रॅम + 512GB स्टोरेज RMB 5,999 जवळपास 68,100 रुपयांचा आहे.
- 16GB रॅम + 1TB स्टोरेज ऑप्शन RMB 6,999 म्हणजे जवळपास 79,500 रुपयांचा मिळेल.
- 24GB रॅम + 1TB टॉप मॉडेलची किंमत RMB 7,499 म्हणजे जवळपास 85,100 रुपये ठेवण्यात आली आहे.
- 16GB रॅम +512GB स्टोरेज वाले RedMagic 8S Pro+ Bumblebee Edition RMB 6,499 जवळपास 73,800 रुपयांमध्ये येतो.















