Xiaomi करणार आहे धमाका, घेऊन येत आहे 144MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि Samsung आपल्या नवीन कॅमेरा सेंसर वर काम करत आहे जो 150 मेगापिक्सल रेजोल्यूशनचे फोटो घेऊ शकेल. आता बातमी समोर येत आहे कि चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी 144MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणारी पहिली कंपनी असेल.

काही दिवसांपूर्वी 108MP असलेला Mi Note 10/Mi CC9 Pro स्मार्टफोन कंपनीने आणला होता. आता भारतातील प्रसिद्ध लीक्सटर Sudhanshu ने ट्विट करून माहिती दिली आहे कि शाओमी 144MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन वर काम करत आहे. या स्मार्टफोनचे नाव Mi 10S Pro किंवा Mi CC10 Pro असे असू शकते. रिपोर्टनुसार जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा बनवण्यासाठी शाओमीने दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भागेदारी केली आहे.

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि सॅमसंग आपल्या 150 मेगापिक्सल रेजॉलूशन असलेल्या सेंसर वर काम करत आहे. सॅमसंगच्या 150 मेगापिक्सल सेंसरचा आकार 1 इंच असेल. हा 1/1.33 इंच ISOCELL Bright HM1 सेंसर पेक्षा मोठा असेल.

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी बनवत असलेला हा 150 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर नोनासेल टेक्नोलॉजी वर आधारित असेल, जो कंपनीने ISOCELL Bright HM1 मध्ये पण वापरला होता. हा सेंसर कंपनीने Samsung Galaxy S20 Ultra मध्ये पण दिला आहे. विशेष म्हणजे हा जुन्या Tetracell टेक्नोलॉजीचा अपग्रेड पण आहे, जी ISOCELL Bright HMX सारख्या सेंसर मॉड्यूल मध्ये दिली जाते.

या सेंसरचा शाओमी व्यतिरिक्त Oppo आणि Vivo पण वापर करू शकते. याचा अर्थ असा कि या कंपन्या आपल्या फोन्स मध्ये आगामी काळात 150 मेगापिक्सल सेंसरचा वापर करतील. काही रिपोर्ट्सनुसार चिनी कंपनी शाओमी यावर्षी चौथ्या तिमाहीत हा सेंसर आपल्या फ्लॅगशिप मध्ये देण्याचा विचार करत आहे.

दुसरीकडे वीवो आणि ओप्पो हा सेंसर आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये साल 2021 च्या पहिल्या तिमाहीत वापरू शकतात. या सेंसर सह कंपनी फोन मध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर आणि अनेक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर पण करेल.

सॅमसंगच्या 108 मेगापिक्सल सेंसर बद्दल बोलायचे झाले तर यात हैराणीची बाब म्हणजे 108 मेगापिक्सलच्या सेंसरच्या माध्यमातून 12032 x 9024 पिक्सल रेज्ल्यूशन असलेले फोटो क्लिक करता येतील. इतकेच नव्हे तर हा सेंसर असलेल्या फोनने वीडियो रेकॉर्ड केल्यास त्याचे 6K रेज्ल्यूशन असेल म्हणजे 6016 x 3384 पिक्सल्स. हा सेंसर 30fps म्हणजे 1 सेकंदात 30 फ्रेम कॅप्चर करू शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here