30 सप्टेंबरला Xiaomi करेल मी 10टी सीरीज सादर, लॉन्च होऊ शकतात Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro

Xiaomi बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती कि कंपनी टेक मार्केट मध्ये आपली ‘मी 10टी सीरीज’ आणण्याची योजना बनवत आहे आणि या सीरीजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण येऊ शकतात. आता शाओमीने अधिकृतपणे मी 10टी सीरीजची घोषणा करत सांगितले आहे कि कंपनी येत्या 30 सप्टेंबरला आपली नवीन सीरीज जगासमोर सादर करेल. चर्चा आहे कि या सीरीज अंतर्गत Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील.

शाओमीच्या घोषणेनुसार येत्या 30 सप्टेंबरला कंपनी एका ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून मी 10टी सीरीज सादर केली जाईल. हा ईवेंट भारतात संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो लाईव बघता येईल. कंपनीने आतापर्यंत सीरीज मधील फोन्सची नावे सांगितली नाहीत पण बोलले जात आहे कि 30 सप्टेंबरला Xiaomi Mi 10T, Mi 10T Lite आणि Mi 10T Pro लॉन्च केले जातील. चर्चा अशी आहे कि शाओमी हे फोन्स नंतर भारतात पण लॉन्च करेल.

144Hz डिस्प्ले

Xiaomi Mi 10T Pro चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आधीच इंटरनेट वर लीक झाले आहेत. यात सांगण्यात आले आहे कि हा फोन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो एलसीडी पॅनल वर बनलेला असेल. विशेष म्हणजे अलीकडेच लॉन्च झालेल्या Mi 10 Ultra मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालणारा 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला होता. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला होता तर मी 10टी प्रो मध्ये साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर असेल.

प्रोसेसर

लीकनुसार Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865+ चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या चिपसेट सोबतच या स्मार्टफोन्स मध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण मिळेल. लीक मध्ये शाओमी मी 10टी प्रो मध्ये 8 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे.

पावरफुल कॅमेरा

समोर आलेल्या फोटो मध्ये फोनचा रियर कॅमेरा सेटअप बऱ्याच अंशी गिंबल सारख्या स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी वर लॉन्च झालेल्या Vivo X50 Pro सारखा वाटत आहे. कदाचित मी 10टी प्रो पण अश्याच फीचर सह मार्केट मध्ये येईल. लीकनुसार या फोन मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा असेल. Xiaomi Mi 10T मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

5,000एमएएच बॅटरी

शाओमी मी 10टी प्रो 5,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला जाऊ शकतो ज्या सोबत फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण असेल. विशेष म्हणजे मी10 अल्ट्रा शाओमीने 120वॉट फास्ट चार्जिंग सह लॉन्च केला होता जो 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो. या फोन मध्ये रिवर्स वायरलेस चार्जिंग फीचर पण देण्यात आला आहे जो 10वॉट स्पीड वर चालतो. हे पाहता असे म्हणता येईल कि Xiaomi Mi 10T Pro मध्ये पण वायरलेस चार्जिंग मिळेल. ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here