नुकतेच शाआमी ने भारतात रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो मॉडेल लॉन्च केले आहेत. तसेच बातमी आली आहे की कंपनी लवकरच रेडमी नोट 6 प्रो घेऊन येत आहे आणि हा फोन दिवाळीच्या आधी लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन्सची चर्चा सुरू असतानाच कंपनीच्या 6 सीरीजच्या अजून एका फोनची माहिती लीक झाली आहे. गिकबेंच वर शाओमी मी 6एस लिस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की कंपनीने गेल्या वर्षी मी6 सादर केला होता पण हा फोन भारतात उपलब्ध झाला नव्हता. शाओमी मी6एस याचेच एक वर्जन आहे. पण कंपनी ने अजून याची माहिती दिली नाही.
सर्टिफिकेशन साइट गीकबेंच वर शाओमी रेडमी 6एस चे काही स्पेसिफिकेशन पण उपलब्ध आहेत. लिस्ट करण्यात आलेला फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतो. पण फोनचा प्रोसेसर थोडा जुना आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एमएसएम8998 वर चालतो. हा चिपसेट स्नॅपड्रॅगन 835 नावाने ओळखला जातो ज्याचा वापर कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या मी6 आणि मी मिक्स 2 मध्ये केला होता. पण हा हाई रेंज चा प्रोेसेसर आहे जो आपल्या चांगल्या परफॉर्मेंस साठी प्रसिद्ध आहे.
लिस्ट करण्यात आलेल्या फोनच्या प्रोसेसर चा क्लॉकस्पीड 2.11गीगाहट्र्ज आहे. यासोबत 6जीबी रॅम पण आहे. यापेक्षा जास्त माहिती अजूनतरी मिळाली नाही.
शाओमी मी 6 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास वाली 5.15-इंचाची फुल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. शाओमी मी6 मध्ये होम बटन वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल कॅमेरा सोबत डुअल फ्लॅश पण आहे. तसेच सेल्फी साठी तुम्हाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळेल जो एचडी वीडियो रिकॉर्ड करू शकतो.
शोओमी मी6 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. यात 2.5गीगाहट्र्ज चा कोरयो प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी आहे. हा फोन 128जीबी मेमरी सोबत पण उपलब्ध आहे. पावर बॅकअप साठी शाओमी मी6 मध्ये 3,350 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.















