शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन

शाओमी ने आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला आहे. शाओमी ने मी 8 सोबत मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केला आहे. या दोन हाईएंड डिवाईस सह शाओमी ने मी 8 चा एक स्वस्त मॉडेल पण सादर केला आहे जो मी 8 एसई नावाने लॉन्च झाला आहे. शाओमी ने मी 8 एसई 1,799 युआन च्या सुरवाती किंमतीत बाजारात आणला आहे जी भारतीय करंसी नुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी मी 8 एसई ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे. मी 8 एसई पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वालकॉम च्या सर्वात नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 710 ला सपोर्ट करतो. हा चिपसेट त्याच 10एनएम टेक्निक वर बनला आहे जो क्वालकॉम आपल्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 मध्ये वापरते. शाओमी मी 8 एसई मीयूआई 10 आधारित एंडरॉयड ओरियो वर लॉन्च करण्यात आला आहे.

कंपनी ने मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला. दोन्ही वेरिएंट 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. शाओमी मी 8 एसई 5.88-इंचाच्या एमोलेड बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही कॅमेरा सेटअप एआई टेक्निक ला सपोर्ट करतात.

शाओमी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. 4जी वोएलटीई, वाईफाई, एनएफसी व यूएसबी टाईप-सी सपोर्ट सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,120एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता मी 8 एसई च्या 4जीबी वेरिएंट 1,799 युआन (जवळपास 19,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

शाओमी मी 8 चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here