3 कॅमेरा आणि क्वॉलकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च झाले असूसचे दोन फोन, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

तैवानी स्मार्टफोन निर्माता कंपनी असूस ने चुपचाप आपले दोन नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे स्मार्टफोन्स ब्राजील मध्ये सादर केले गेले आहेत. हे फोन्स असूस झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 नावाने लॉन्च केले गेले आहेत. लॉन्च केले गेलेले असूस झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 जवळपास एकसारख्या डिजाइन सह सादर केले गेले आहेत. पण या फोनच्या भारतीय उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

असूस झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 ची किंमत
असूस ब्राजीलच्या वेबसाइट अनुसार झेनफोन मॅक्स शॉट चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,800 रुपये असेल. तसेच फोनच्या 4 जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,600 रुपयांच्या आसपास आहे. तर असूस झेनफोन मॅक्स प्लस एम2 ची किंमत जवळपास 24,800 रुपये आहे.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन सिप
दोन्ही झेनफोन मॉडेल जगातील सुरवातीचे हँडसेट आहेत जे क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगॉन सिस्टम इन पॅकेज (सिप) सह येतात. यात क्वालकॉमने मोबाईल चिपसेटचा आकार अजून कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात स्नॅपड्रॅगॉन सिप मध्ये अनेक कंपोनेंट्स आहेत जे स्नॅपड्रॅगॉन एसओसीचा भाग आहेत.

ओपो ए5एस आणि ए1के चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, दोन्ही फोन लवकरच येतील बाजारात

असूस झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता असूस झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 फोन्स मध्ये 6.26 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर झेनफोन मॅक्स शॉट आणि झेनफोन मॅक्स प्लस एम2 मध्ये स्नॅपड्रॅगॉन एसआईपी 1 आहे. रॅम आणि स्टोरेज बद्दल बोलायचे तर असूस झेनफोन मॅक्स शॉट चे दोन वेरिएंट असतील- 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज. तसेच झेनफोन मॅक्स प्लस एम2 चा एकच वेरिएंट आहे, ज्यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. फोन माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो, ज्याने स्टोरेज वाढवता येते.

5,000एमएएच बॅटरी वाले गॅलेक्सी एम20 साठी आता वाट बघावी लागणार नाही, सॅमसंगचा स्वस्त फोन ओपन सेल साठी उपलब्ध

पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी आहे. फोन एंड्रॉयड 8.1 ओरियो सह रिलीज झाले आहेत, पण कंपनी ने एंड्रॉयड पाई अपडेटची गॅरंटी दिली आहे. फोटोग्राफी साठी झेनफोन मॅक्स शॉट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे 12-मेगापिक्सल, 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे सेंसर्स आहेत. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे झेनफोन मॅक्स प्लस एम2 डुअल कॅमेरा सेटअप सह येतो. मागे 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे सेंसर आहेत. तसेच या फोन मध्ये पण 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here