6जीबी रॅम असलेला शाओमी मी ए2 इंडियन साइट वर झाला लिस्ट, किंमत 19,999 रुपये

यावर्षी ऑगस्ट मध्ये शाओमी ने मी ए2 मॉडेल भारतात सादर केला होता हा कंपनीचा दुसरा फोन आहे जो गूगलच्या एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. लॉन्चच्या वेळी कंपनीने सांगितले होते कि हा फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरियंट मध्ये येईल. लॉन्चच्या वेळी फक्त 4जीबी वाला मॉडेलच सेल साठी उपलब्ध होता पण आता याचा 6जीबी रॅम वेरियंट पण शाओमी इंडिया स्टोर वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे या फोनची किंमत 19,999 रुपये आहे. अजूनतरी हा फोन स्टॉक मध्ये नाही फक्त नोटिफाई मी चा ऑप्शन देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 चा 4जीबी वेरियंट ब्लॅक, ब्लू, गोल्ड, रेड आणि रोज गोल्ड सहित 5 रंगांत उपलब्ध आहे .तर 6जीबी वॉल मॉडेल फक्त 4 रंगात उपलब्द आहे. यात रोज गोल्डचा आॅप्शन नाही. रंगाव्यतिरिक्त मेमरी मध्ये पण फरक असेल. शाओमी मी ए2 च्या 6जीबी वाल्या मॉडेल मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे तर 4जीबी वाल्या मध्ये फक्त 64जीबी स्टोरेज आहे.

शाओमी मी ए2 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here