शाओमी ने 3,000 रुपयांनी कमी केली मी ए2 ची किंमत, हि आहे नवीन किंमत

शाओमी ने गेल्या वर्षी भारतात आली मी ए स्मार्टफोन सीरीज वाढवत मी ए2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नवीन वर्षात आता कंपनी ने मी ए2 ची किंमत कमी केली आहे, ज्यावरून असे वाटते कि कंपनी 15—20 हजार रुपयांच्या रेंज मध्ये नवीन फोन लॉन्च करू शकते. पण याबद्दल लीक व माहिती अजून आली नाही. जर शाओमी मी ए2 बद्दल बोलायचे तर कंपनीच्या या एंडरॉयड वन स्मार्टफोनच्या दोन वेरिएंट मध्ये 3,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार मी ए2 चा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट आता 13,999 रुपयांमध्ये सेल केला जाईल. या वेरिएंटची आधी किंमत 15,999 रुपये होती. तसेच 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची नवीन किंमत कपातीनंतर 15,999 रुपये झाली आहे. याआधी हा डिवाइस 18,999 रुपयांमध्ये विकला जात होता. स्मार्टफोन कमी किंमतीत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर विकत घेता येईल. मी डॉट कॉम वर आता स्मार्टफोनचे दोन्ही वेरिएंट जुन्या किंमतीती विकले जात आहेत.

शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वर 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. शाओमीचे सर्व फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी ने एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर केला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत. शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here