5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या शाओमी मी मॅक्स 3 चा झाला खुलासा, लवकरच होणार आहे लॉन्च

शाओमी चे सीईओ लेई जून ने ज्या दिवशी सांगितले होते की कंपनी शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी मॅक्स 3 वर काम करत आहे त्या दिवसा पासुन टेक बाजारात या फोन ची चर्चा चालू आहे. लेई जून ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यामातून मी मॅक्स 3 लवकरच येत असल्याची बातमी दिली होती. सीईओ ने ईशारा केला होता कि शाओमी मी मॅक्स 3 जुलै महिन्यापर्यंत अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा फोन वेईबो वर लिस्ट करण्यात आला होता, ज्यात फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. तसेच आता मी मॅक्स 3 च्या फोटो सह याची किंमत पण लीक झाली आहे.

मी मॅक्स 3 ला आईटी मोबाइल चॅनल ने वेईबो वर पोस्ट केले आहे. या पोस्ट मध्ये शाओमी मी मॅक्स 3 चा फोटो दाखवण्यात आला होता फोटो सोबत फोन चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत पण लिहिण्यात आली आहे. या लीक मध्ये मी मॅक्स 3 चे 3 वेरिएंट दाखवण्यात आले आहेत ज्यांचे मॉडेल नंबर एम1804ई4ए, एम1804ई4टी आणि एम1804ई4सी आहेत. सर्वात आधी फोन ची किंमत पाहता या पोस्ट नुसार मी मॅक्स 3 शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल. पण ही प्राइस फोन ची सुरवाती किंमत आहे असे सांगण्यात आले आहे.

शाओमी मी मॅक्स 3 च्या डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर समोर आलेल्या फोटो नुसार हा एक बेजल लेस स्मार्टफोन असेल जो 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाऊ शकतो. फोटो मध्ये फोन च्या फ्रंट पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे तसेच बॅक पॅनल वर कपंनी च्या मी8 स्मार्टफोन प्रमाणे वर्टिकल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच शाओमी चा लोगो आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत.

शाओमी च्या या आगामी डिवाईस चे स्पेसिफिकेशन्स पण या पोस्ट मध्ये शेयर करण्यात आले आहेत. या लीक नुसार मी मॅक्स 3 मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो तसेच हा मेटल डिजाईन सह सादर केला जाईल. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या वेरिएंट्स मध्ये 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सर्व वेरिएंट्स मध्ये 128जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

मी मॅक्स 3 मधील चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाईल. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. तसेच वेईबो वर ताजा लीक मध्ये मी मॅक्स 3 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला प्रोसेसर दिला जाणार असल्याची बाब समोर आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या लीक नुसार मी मॅक्स 3 चा डुअल रियर कॅमेरा एआई क्षमता वाला असेल ज्यात सोनी आईएमएक्स363 सेंसर असू शकतो. फोन मध्ये एम्प्लीफायर स्पीकर्स असतील तसेच फोन मध्ये इंन्फ्रारेड टेक्निक पण असेल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल. शाओमी ने मी मॅक्स 3 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अशा आहे की कंपनी लवकरच या फोन च्या लॉन्च ची तारीख अनाउंस करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here