शाओमीचा अपकमिंग फ्लॅगशिप मोबाईल Xiaomi MI Mix 4 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. त्यानुसार या फोनमध्ये काही वैशिष्ट्ये मिळतील जे टेक्नॉलजीच्या दृष्टीने जबरदस्त असतिल. तसेच, Xiaomi CEO Lei Jun यांनी आधीच सांगितले होते की मी मिक्स फोन (Mi MIX 4) यावर्षीच्या शेवटी लॉन्च केला जाईल. तसेच आता एका ट्विटर यूजर Xiaomiui ने शाओमीच्या मॉडेल नंबर K2B आणि कोडनेम ODIN बाबत माहिती दिली आहे. लीक्सटरनुसार ही माहिती कंपनीच्या अपकमिंग मी मिक्स 4 बाबत आहे. ट्विट मध्ये Mi MIX 4 चे स्पेसिफिकेशन्सबाबत खुलासा झाला आहे. चला एक नजर टाकूया फोनच्या नवीन लीकवर.
Mi MIX 4 चे स्पेसिफिकेशन्स
लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Mi MIX 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह क्वाड HD + AMOLED डिस्प्ले असेल. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC असेल जो 5G सपोर्टसह येईल आणि यात mmWave सपोर्ट असू शकतो. कॅमेर्यासाठी कथित Mi MIX 4 को 50MP Sony IMX766 प्राइमरी सेंसर, 48MP अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 5x ऑप्टिकल झूमसह 48MP टेलीफोटो लेंस असेल. तसेच फोनचा कॅमेरा 120x हाइब्रिड झूम, 15x वीडियो झूम, 1920fps स्लो स्पीड वीडियो शूटिंग, आणि 8K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट सारखे फीचर्सने सुसज्जित असेल. सध्या हा फक्त एक लीक आहे त्यामुळे निश्चितपणे काही बोलता येणार नाही.
2019 पासून आहे फोनची चर्चा
Mi MIX 4 ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. साल 2019 च्या सुरुवातीला फोन बाबत माहिती येण्यास सुरुवात झाली होती. पण, साल 2020 पर्यंत हा फोन सादर करण्यात आला नाही. यावर्षी हा फोन येईल असे बोलले जात आहे. Xiaomi चा हा फोन मी मिक्स सीरीजचा पहिला कर्मशियल फोन असेल, ज्याचे नाव Mi MIX 4, Mi MIX फोल्ड किंवा दुसरे काहीतरी असू शकते.
अशी असेल डिजाइन
आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Mi Mix 4 मध्ये बाहेरच्या बाजूस फोल्ड होणारी डिस्प्ले डिजाइन दिली जाऊ शकते, जशी आपण Huawei Mate XS मध्ये पहिली आहे. त्याचबरोबर एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की शाओमीच्या या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये असा डिस्प्ले असेल जो फोल्ड झाल्यावर 6.38 इंचाचा होईल.














