8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Xiaomi Pad 6 मध्ये फ्लॅगशिप क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे.
  • टॅबलेटमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग मिळते.
  • टॅबलेटची किंमत 26,999 रुपये आहे.

Xiaomi Pad 6 अखेर भारत लाँच झाला आहे. चीनमध्ये एप्रिलमध्ये आलेला हा टॅबलेट भारतातील Xiaomi Pad 5 ची जागा घेईल. Xiaomi Pad 6 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 13मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 आणि 8,840एमएएचची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Xiaomi Pad 6 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Xiaomi Pad 6 ची किंमत आणि विक्री

  • Xiaomi Pad 6 ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते जी 6जीबी + 128जीबी मॉडेलची किंमत आहे.
  • तर 28,999 रुपयांमध्ये 8जीबी + 256जीबी व्हर्जन विकत घेता येईल.
  • हा टॅबलेट Mi.com, Amazon आणि शाओमी रिटेल स्टोर्सवर विकत घेता येईल.
  • टॅबलेटची विक्री 21 जूनपासून सुरु होईल.
  • कंपनी 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर देत आहे.
  • त्याचबरोबर सेकंड जेनरेशन शाओमी स्मार्ट पेन (5,999 रुपये), शाओमी पॅड 6 स्मार्ट कव्हर (1,499 रुपये), आणि कीबोर्ड अटॅचमेंट (4,999 रुपये) यांची देखील विक्री सुरु होईल.

Xiaomi Pad 6 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Xiaomi Pad 6 मध्ये 11-इंचाचा 2.8के डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 2880 x 1800 पिक्सल रिजोल्यूशन, 16:10 आस्पेक्ट रेशियो, 144हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, एचडीआय 10, डॉल्बी व्हिजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते.
  • चिपसेट : Chipset: हा टॅबलेट 7 नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटवर चालतो जोडीला Adreno 650 जीपीयू ग्राफिक्ससाठी देण्यात आला आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: शाओमी पॅडमध्ये 8GB LPDDR5 RAM आणि 256 UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
  • ओएस : हा टॅबलेट अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.
  • कॅमेरा : Xiaomi Pad 6 च्या मागे एफ/2.2 अपर्चर असलेला 13मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
  • बॅटरी : Xiaomi Pad 6 मध्ये 8840एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कनेक्टिव्हिटी : टॅबलेटमध्ये Wi-Fi 6 802.11, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here