Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi 24 ऑक्टोबरला मार्केट मध्ये 108MP कॅमेरा असलेला फोन सादर करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे शाओमीचे सीईओ ली जून यांनी कंपनीच्या 5G स्मार्टफोन्सबद्दल चालू असलेल्या योजेनेसंबंधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले कि पुढ्ल्यावर्षी शाओमी 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन आणण्याचा विचार करत आहे.

ते म्हणतात कि कंपनीला 5G नेटवर्कची कनेक्टिविटी पूर्णपणे सुरु झाल्यास त्यांच्याकडे 5G स्मार्टफोन्सची चांगली रेंज असावी. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे कि ते महाग आणि प्रीमियम 5G डिवाइसेज सोबत एंट्री लेवल 5G स्मार्टफोन्स पण मार्केट मध्ये सादर करतील.

न्यूज एजेंसी रायटर्सच्या एका रिपोर्टनुसार ली जून यांनी वर्ल्ड इंटरनेट कॉन्फ्रेंस मध्ये कंपनी साल 2020 मध्ये 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स मॉडेल लॉन्च करणार असे म्हटले आहे. असे झाले तर पुढच्यावर्षी आपल्याला शाओमीचे 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन्स 5जी सपोर्ट सह दिसतील.

कंपनीने सप्टेंबर मध्ये Mi 9 Pro 5G लॉन्च केला होता. जून यांनी म्हटले होते कि इंडस्ट्रीमधील लोकांना भीती आहे कि पुढच्यावर्षी 4G मॉडेल्सची विक्री बंद होईल. हे एक असे पाऊल आहे जे मनात नसतानाही टाकवे लागत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि ऑपरेटर्स पण आपले 5G बेस स्टेशन्सचा वेगाने विस्तार करतील. विशेष म्हणजे Lu Weibing यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि रेडमी के सीरीजचा आगामी स्मार्टफोन SA/NSA dual-mode 5G सपोर्टेड असेल. फोनचे हे फीचर 5G कनेक्टिविटी मजबूत आणि चांगली करेल. तसेच क्वालकॉमने अलीकडेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या या चिपसेट सह लॉन्च केला जाईल. म्हणजे Redmi K30 5जी सपोर्ट सह येईल.

किंमत पाहता Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याला उत्तर देत रेडमीचे जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महाग आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मधेच लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 ला पण जास्त किंमत असल्यामुळे टीका झेलावी लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here