6जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह लिस्ट झाला शाओमी पोकोफोन एफ1, चालतो स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर

शाओमी च्या आगामी स्मार्टफोन पोकोफोन एफ1 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आले होते की कंपनी आपला हा स्मार्टफोन भारतात आणण्याचे प्लानिंग करत आहे आणि लवकरच हा भारतात लॉन्च केला जाईल. शाओमी ने अजून फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही तर दुसरीकडे पोकोफोन एफ1 रोमानिया च्या आॅनलाईन रिटेल साइट वर लिस्ट झाला आहे. वेबसाइट वर दिसल्यामुळे शाओमी पोकोफोन एफ1 च्या लॉन्च च्या आधी या याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सह फोन च्या किंमतीची माहिती मिळाली आहे.

शाओमी पोकोफोन एफ1 रोमानिया च्या पीसी गॅरॉज वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मधून फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. लिस्टिंग वरून समजले आहे की पोकोफोन एफ1 ट्रेंड मधील 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 5.99-इंच की फुलएचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे जो 416पीपीआई ला सपोर्ट करतो.

लिस्टिंग नुसार शाओमी चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9 वर बनेलेला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच फोन 128जीबी इंटरनल स्टोरेज सह वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

शाओमी पोकोफोन एफ1 च्या या लिस्टिंग वरून समजते की फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट, 4जी वोएलटीई, रियर फिंगर​प्रिंट सेंसर आणि क्विक चार्ज 3.0 टेक्नोलॉजी सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे शाओमी ने अजूनतरी हा स्मार्टफोन जगासमोर आणला नाही. कंपनी ने फोन च्या किंमतीची आॅफिशियल घोषणा केली नाही पण या वेबसाइट वर शाओमी पोकोफोन भारतीय करंसी नुसार 34,500 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन बाजारात कधी येतो आणि त्याची किंमत किती असेल यासाठी तसेच या फोनच्या इंडिया लाँच साठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here