OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज

OPPO ने साल 2020 च्या शेवटच्या महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘रेनो सीरीज’ ची नवीन जेनरेशन सादर केली होती. या सीरीज अंतगर्त OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च झाले होते जे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हि एक 5G सीरीज म्हणून समोर आली होती ज्यात दोन्ही स्मार्टफोन 5जी कनेक्टिविटी सह आले आहेत. चीन मध्ये यश मिळवल्यानंतर रेनो 5 सीरीज भारतात पण येत आहे जो येत्या 18 जानेवारीला भारतात लॉन्च होईल.

ओपो इंडियाने सांगितले आहे कि कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि ईवेंटच्या मंचावरून ‘रेनो 5 सीरीज’ भारतीय बाजारात येईल. हा ईवेंट 18 जानेवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल. या दिवशी OPPO Reno5 Pro 5G लॉन्च होईलच सोबतच OPPO Reno5 चा 4G मॉडेल पण भारतात येऊ शकतो.

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

हे देखील वाचा : Motorola लवकरच सादर करेल स्वस्त 5G फोन Moto Ibiza, यात असेल 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

फोटोग्राफी

ओपो रेनो5 प्रो 5जी आणि ओपो रेनो 5 दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here