शाओमी बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या एका नव्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एंडरॉयड गो सह येईल. बातम्यांमध्ये समोर आले होते कि शाओमी आपला हा स्मार्टफोन रेडमी गो नावाने बाजारात आणेल. आज शाओमीने अधिकृतपणे आपला हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. शाओमी ने सोशल मीडिया अकाउंट वरून रेडमी गो ऑफिशियल केला आहे.
शाओमी ने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून ट्वीट करत रेडमी गो ची माहितीदिली आहे. या ट्वीट मध्ये शाओमी ने फक्त रेडमी गो स्मार्टफोनचा फोटो शेयर केला नसून सोबत या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेअर केले आहेत. शाओमी रेडमी गो ची सर्वात मोठी खासियत या फोनचे एंडरॉयड गो वर्जन वर लॉन्च होणे आहे. एंडरॉयड गो असल्यामूळे शाओमीचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस वर बाजारात येईल आणि आगामी एंडरॉयडचे नवे अपडेट पण या फोनला इतरांपेक्षा आधी मिळतील.
"GO" for something new! Today we're introducing the new #RedmiGo. RT if you'll be getting one #GoSmartDoMore pic.twitter.com/H9lPR9C5Sm
— Mi (@xiaomi) January 29, 2019
रेडमी गो कपंनी ने जुन्या डिजाईन वर सादर केला आहे ज्यात बेजल लेस डिस्प्ले किंवा नॉच देण्यात आलेली नाही. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनल वर पण सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. दिसायला हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला वाटतो, ज्याच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.
शाओमीने ट्वीट मधून सांगितले कि रेडमी गो मध्ये 5-इंचाचा एचडी डिस्प्ले दिला जाईल जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर चालेल. कंपनी ने अजूनतरी चिपसेटची माहिती दिली नाही.
रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. शाओमी ने रेडमी गो मध्ये देण्यात येणार रॅम तसेच इंटरनल स्टोरेज गुलदस्त्यात ठेवली आहे, पण अशा आहे कि या फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी ने आतापर्यंत रेडमी गो ची किंमत सांगितली नाही. पण एवढे निश्चित कि रेडमी गो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होईल. बातमीनुसार रेडमी गो मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी इंटरनल स्टोरेज असेल तसेच हा फोन स्नॅपड्रॅगॉन 427 चिपसेट वर चालेल. शाओमी इंडिया रेडमी गो भारतात कधी येईल या माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.















