Xiaomi Redmi Note 10 Pro इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लाॅन्च आला जवळ

Xiaomi च्या रेडमी नोट सीरीजच्या नवीन डिवाईस Redmi Note 10 Pro बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती की हा स्मार्टफोन एफसीसी सर्टिफिकेशन्स साइट आणि इंडियन एजेंसीच्या की CEIR IMEI वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग्स नंतर आशा व्यक्त केली जात होती की कंपनी आपला हा स्मार्टफोन लवकरच टेक मंचावर सादर करू शकते. तसेच आता रेडमी नोट 10 प्रो भारतीय सर्टिफिकेशन्स साईट बीआईएस वर पण लिस्ट झाला आहे त्यामुळे Xiaomi Redmi Note 10 Pro च्या भारतातील लाॅन्चची स्थिती स्पष्ट झाली आहे.

Redmi Note 10 Pro बीआईएस M2101K6I माॅडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हा फोनचा इंडियन वर्जन असल्याचे बोलले जात आहे कारण रेडमी नोट 10 प्रो च्या ग्लोबल वर्जनचा माॅडेल नंबर M2101K6G आहे. बीआईएस वर फोनचे स्पेसिफिकेशन्स डिटेल्स समोर आले नाहीत पण या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की Xiaomi Redmi Note 10 Pro स्मार्टफोन साल 2021 मध्ये भारतात लाॅन्च होणारा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 10 Pro बद्दल आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंड्राइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही माॅडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी माॅडेलच लाॅन्च केला जाईल. तसेच दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

फोटोग्राफीसाठी ही सीरीज क्वाॅड रियर कॅमेर्‍यासह लाॅन्च केला जाईल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेर्‍याला पण सपोर्ट करतात जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.

एफसीसी लिस्टिंग मध्ये समोर आले आहे की रेडमी नोट 10 प्रो एंड्राइड 11 ऑपरेटिंग सिस्टम MIUI 12 वर चालेल. तसेच फोनचे तीन वेरिएंट-6GB + 64GB, 6GB + 128GB, और 8GB + 128GB असतिल. त्याचबरोबर समोर आले आहे की Redmi Note 10 Pro डुअल-बँड, वाई-फाई, एफएम रेडियो, ब्लूटूथ आणि 4जी एलटीई कनेक्टिविटीसह येईल. असे बोलले जात आहे की फोनचा 5G मॉडेल पण येणार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here