शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती

कमी किंमतीती ताकदवान स्पेसिफिकेशन्स देणाऱ्या ब्रँड्स मध्ये शाओमीचे नवा सर्वात वर असते. इंडियन स्मार्टफोन बाजारातील सर्वात मोठ्या हिस्स्यावर शाओमीचे राज्य आहे. यावर्षीच्या सुरवातीला शाओमी ने रेडमी नोट 7 लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 शाओमी द्वारा लॉन्च केला गेलेला पहिला स्मार्टफोन आहे जो 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 साध्य फक्त चीनी मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह जगभरातील इतर बाजारांमध्ये येईल. रेडमी नोट 7 ने चीन मध्ये सेलचे नवे रेकॉर्ड बनवले आहेत. एकाच महिन्यात या स्मार्टफोनचे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत आणि याच कारणामुळे इंडियन स्मार्टफोन यूजर्स रेडमी नोट 7 ची आतुरतेने वाट बघत आहेत.

रेडमी नोट 7 भारतात कधी येईल याबद्दल शाओमी इंडियाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. चीन मध्ये रेडमी नोट 7 सेल साठी उपलब्ध आहे, पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे समोर आले आहे कि शाओमी भारतात रेडमी नोट 7 सोबत रेडमी नोट 7 प्रो पण लॉन्च करेल. विशेष म्हणजे रेडमी नोट 7 सोबत शाओमी ने रेडमीला नवीन सब-ब्रँड म्हणून घोषित केले आहे आणि रेडमी नोट 7 रेडमी ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन लुक आणि डिजाईन मध्ये आकर्षक आहे तसेच स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर महाग स्मार्टफोन्सना टक्कर देतो.

रेडमी नोट 7
रेडमी नोट 7 ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने हा गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केला आहे.

जियो नव्हे एयरटेल आहे भारतातील सर्वात फास्ट 4जी नेटवर्क, रिपोर्ट मधून झाला खुलासा

शाओमी रेडमी नोट 7 चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःहून अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 9 सह येतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये 64बिट ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

साल 2018 मध्ये भारतीयांनी खरेदी केले 1423 लाख स्मार्टफोन (14,23,00,000), शाओमीने पुन्हा प्रथम

शाओमी रेडमी नोट 7 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व जीपीएस सह आईआर ब्लास्टर पण देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 मध्ये 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करते.

रेडमी नोट 7 चीन मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच रेडमी नोट 7 चा सर्वात पावरफुल वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 चीन मध्ये ट्ववाईलाइट गोल्ड, फॅन्टसी ब्लू आणि ब्राइट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 7 प्रो बद्दल काही सांगितले नाही पण अनेक लीक्स मध्ये या फोनची स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. बोलले जात आहे कि इंडिया मध्ये शाओमी द्वारा रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला जाईल. रेडमी नोट 7 प्रो कंपनीच्या नोट 7 सारख्या डिजाईन वर बनवला जाईल आणि या फोन मध्ये पण वॉटरड्रॉप नॉच मिळेल. रेडमी नोट 7 प्रो स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत रेडमी नोट 7 पेक्षा जास्त एडवांस आणि पावरफुल असेल.

रेडमी नोट 7 प्रो बद्दल समोर आले आहे कि या फोन मध्ये पण 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. रेडमी नोट 7 मध्ये सॅमसंगचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर रेडमी नोट 7 प्रो मध्ये सोनी आईएमएक्स586 सेंसर दिला जाऊ शकतो. रेडमी नोट 7 प्रो पण भारतात 6जीबी रॅम सह येऊ शकतो.

सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा

चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे पण रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर अजूनतरी कोणताही स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. आणि जर लीक मधील स्पेसिफिकेशन्स ठरले तर रेडमी नोट 7 प्रो या चिपसेट सह येणार पहिला स्मार्टफोन असेल.

इंडिया लॉन्च
शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 7 प्रो किंवा रेडमी नोट 7 च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये रेडमीचे नवे स्मार्टफोन इंडिया मध्ये लॉन्च करेल. हे स्मार्टफोन लोवर मीड बजेट मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात तसेच बाजारात 10,000 रुपये ते 15,000 रुपयांच्या दरम्यानच्या किंमतीती शाओमी आपले हे फोन लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here