iQOO Z7 5G फोन 18 हजारांपेक्षा कमी किंमतीत होऊ शकतो भारतात लाँच; समोर आली किंमत

Highlights

  • iQOO Z7 5G फोनची किंमत 17,999 रुपये असू शकते.
  • हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
  • आयकू झेड7 5जी फोन 21 मार्चला भारतात लाँच होत आहे.

iQOO Z7 5G फोन 21 मार्चला भारतात लाँच होणार आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आधीच शेयर केले आहेत. आता आयकू झेड7 5जी ची प्राइस देखील समोर आली आहे. इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन 17,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो तसेच दोन मेमरी व्हेरिएंट्स सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

आयकू झेड7 5जीची लीक किंमत

91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून iQOO Z7 5G च्या मेमरी व्हेरिएंट्स तसेच किंमतीची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन दोन मेमरी वेरिंएट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल ज्यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आयकू झेड7 5जीची किंमत 17,999 रुपये असू शकते. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. तसेच सांगण्यात आलं आहे की हा फोन Pacific Night आणि Norway Blue कलरमध्ये मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

आयकू झेड7 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • MediaTek Dimensity 920
  • ultra gaming mode
  • 6.4″ AMOLED Display
  • 64MP Rear camera
  • 4,500mAh battery

मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 6.4 इंच वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येऊ शकते आणि 1200हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकते. फोन स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्ससह येऊ शकतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट मिळू शकतो. या आयकू फोनच्या डिस्प्लेमध्ये एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळू शकतात.

iQOO Z7 5G फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 920 प्रोसेसर असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. विशेष म्हणजे या आयकू मोबाइलला 4,85,000 पेक्षा जास्त AnTuTu Score मिळाला आहे. भारतात लाँच होणाऱ्या आयकू झेड7 5जी फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट मार्केटमध्ये एंट्री करू शकतात.

हा आयकू फोन मोबाइल गेमिंगसाठी चांगला ठरू शकतो. या फोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड तसेच 4डी गेम वायब्रेशन सारखे फीचर्स मिळू शकतात. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंटला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 21 मार्चची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here