रेडमी नोट 6 प्रो नोव्हेंबर मध्ये होईल भारतात लॉन्च, डुअल सेल्फी कॅमेरा असेल यात

शाओमी इंडिया ने नुकतेच भारतात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाले आहेत तसेच शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणी मध्ये पण सामील झाले आहेत. पण आता शाओमी फॅन्स साठी आश्चर्यकारक अशी बातमी समोर आली आहे कि शाओमी लवकरच भारतात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो लॉन्च करणार आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल माहिती मिळाली आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्येच रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च करेल. रेडमी नोट 6 प्रो संबंधित एक ईमेज मीडिया रिपोर्ट मध्ये शेयर करण्यात आली आहे ज्यात फोनच्या लॉन्च डेट चा उल्लेख करण्यात आला आहे. या ईमेज मध्ये रेडमी नोट 6 प्रो के लॉन्च डेटच्या समोर ‘1.. नोव्हेंबर’ लिहिण्यात आले आहे. म्हणजे शाओमीचा हा शानदार स्मार्टफोन 11 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबरच्या दरम्यान भारतात लॉन्च करण्यात येईल.

शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कामेरर देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात अली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here