झेडटीई ने लॉन्च केला आपला पहिला 5जी स्मार्टफोन, काही सेकंदात संपूर्ण फिल्म होईल डाउनलोड

चीनच्या टेलीकॉम कंपनी झेडटीई ने एमडब्लूसी 2017 इवेंट मध्ये पहिला 5जी स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन बर्सिलोना मध्ये चालू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये सादर केला आहे. पण हा काही पहिला 5जी फोन नाही जो या इवेंट मध्ये सादर केला गेला आहे. याआधी सॅमसंग, हुआवई आणि एलजी ने आपापले 5जी फोन सादर केले आहेत.

याव्यतिरिक्त वनप्लस ने पण आपला 5जी प्रोटोटाइप डिवाइस दाखवला आहे. झेडटीई च्या 5जी फोन बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा डिवाइस झेडटीई एक्सॉन 10 प्रो 5जी नावाने सादर केला आहे. हा डिवाइस यावर्षी यूरोप आणि चीन मध्ये उपलब्ध होईल.

कंपनी द्वारा लॉन्‍च केला गेलेला हा 5जी स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 4जी सर्विस पेक्षा 10 पट जास्त चांगला स्‍पीड मिळेल आणि जवळपास एका सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. या फोन मध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आहे. एक्‍स 6 एलटीई मॉडेम इंटीग्रेशन सह लॉन्‍च केला गेला आहे. कंपनी ने सांगितले कि टेक कंपन्या 5जी आईटी बेसबँड यूनिट वर आधारित आहे. या फोनने 360 डिग्री पॅनोरमिक वर्चुअल रियलिटी वीडियो आणि अल्ट्रा हाई-फाई म्यूजिक आणि वीडियो साठी फास्ट डाउनलोड सपोर्ट मिळतो. झेडटीई ने 5जी फोन सोबत ब्लेड वी10 नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस पण यावर्षी यूरोप, चीन आणि लॅटिन अमेरिकेत उपलब्ध केला जाईल. पण 5जी आणि ब्लेड वी10 च्या भारतीय उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ब्लेड वी10 चे स्पेसिफिकेशन्स
ब्लेड वी10 बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा एफएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर 2.1 गीगाहर्ट्ज आहे. सोबत डिवाइस 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज व 4जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत.

ब्लेड वी10 कंपनी ने ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. फोटोग्राफी साठी फोनच्या मागील बाजूस डुअल कॅमेरा आहे, ज्यात 16-मेगापिक्सल +5-मेगापिक्सलचे कॉम्बिनेशन आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा डिवाइस एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. कनेक्टिविटी साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here