Samsung आणि Xiaomi राहिले मागे, या कंपनीने लॉन्च केला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन

स्मार्टफोन यूजर्सना फ्यूचर टेक्नॉलजी देण्यासाठी सध्या जवळपास सर्व मोबाईल फोन निर्माता कंपन्या काम करत आहेत. गेल्यावर्षी ओपोने अशीच एक नवीन टेक्नोलॉजी (अंडर स्क्रीन कॅमेरा) असलेला स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) मध्ये दाखवला होता. तर काही दिवसांपूर्वी शाओमीने पण आपल्या नवीन जनरेशनच्या अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या फोनची झलक दाखवली होती. पण आतापर्यंत कोणत्याही कंपनीने अश्या टेक्नोलॉजी सह फोन लॉन्च केला नव्हता. आता सॅमसंग, ऍप्पल आणि शाओमी सारख्या ब्रँड्सना मागे टाकत चायनीज मॅन्युफॅक्चरर ZTE ने 5G क्षमतेसह अंडर-स्क्रीन कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे.

शानदार डिजाइन

ZTE AXON 20 5G ग्रेडिटएंट 3D ग्लास बॅक आणि टेन-लेयर स्ट्रक्चर स्टेक डिजाइन वर सादर केला गेला आहे. कंपनीने या फोन मध्ये व्हॅक्युम ऑप्टिकल कोटिंग प्रोसेस पण दिली आहे. एलिगेंट कर्व्स सह सादर करण्यात आलेला हा फोन खूप खास आहे. फोनचा फ्रंट लुक पाहता यात तुम्हाला कोणतीही नॉच आणि होल-पंच दिसणार नाही, ज्यामुळे फोनच्या चारही कडा बेजल लेस आहेत. सोबतच उजवीकडे वॉल्यू रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटन आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चार कॅमेरे आहेत, ज्या सोबत एक एलईडी देण्यात आली आहे. या कॅमेरा मॉड्यूलच्या खाली कंपनीचे नाव आणि त्याखाली फोनचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनच्या डिस्प्ले मध्ये अल्ट्रा-हाई-ट्रांसमिटेंस माइक्रोन-लेवलच्या नवीन मटेरियलचा वापर केला गेला आहे, ज्यात ट्रांसपरंट कॅथोड, स्पेशल OLED आणि एक ट्रांसपरंट अरेचा समावेश आहे. कंपनीने विशेष पिक्सलची व्यवस्था करून डिस्प्ले अजून नैसर्गिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ZTE AXON 20 मध्ये 6.92-इंच (2460 × 1080 पिक्सल) फुल एचडी+ OLED 20.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच जेडटीई एक्सॉन 20 मध्ये ट्रिपल प्रोएक्टिव एल्गोरिथ्म सह 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा फ्रंटला आहे. स्क्रीनच्या खाली कॅमेरा, लाइट सेंसर, स्क्रीन साउंड यूनिट आणि एक अंडर-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी जेडटीई एक्सॉन 5जी मध्ये 4220mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी क्वालकॉम क्विक चार्ज 4+ आणि 30W फास्ट चार्जिंग सह येते. या चार्जिंग टेक्नॉलॉजीने यूजर्स हा फोन फक्त 30मिनिटांत 60 टक्के चार्ज करू शकतात. क्विक चार्ज 4+ के मध्ये 45 वॉट पर्यंतची मर्यादा आहे. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 5G SA / NSA, डुअल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5, GPS / GLONASS / Beidou, USB टाइप- C आणि NFC आहे.

फोन मध्ये शानदार फोटोग्राफीसाठी एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. डिवाइसच्या मागे चार आणि फ्रंटला स्क्रीनच्या खाली एक कॅमेरा आहे. रियर कॅमेरा पाहता यात अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सल 119° अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो व 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला डिस्प्लेच्या खाली अपर्चर f/2.0 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या फोन मध्ये ऑक्टा-कोर (1 x 2.4GHz + 1 x 2.2GHz + 6 x 1.8GHz Kryo 475 CPUs) स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट देण्यात आला आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रिनो 620 GPU आहे. फोन मध्ये 6GB / 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. यूजर्स फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवू शकतात.

किंमत

ZTE AXON 20 5G कंपनीने ब्लॅक, ऑरेंज, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोनच्या 6GB रॅम आणि 128GB वेरिएंटची किंमत 2198 युआन (जवळपास 23,505 रुपये), 8GB रॅम आणि 128GB वर्जनची किंमत 2498 युआन (जवळपास 26,715 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज वर्जनची किंमत 2798 युआन (जवळपास 29,925 रुपये ) आहे. हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे आणि चीन मध्ये 10 सप्टेंबर पासून विक्रीसाठी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here